Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार २४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ११९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १०५ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर मात्र २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ४३ हजार ०३४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्याच्या ‘त्या’ झापडीचे काय?; राणेंच्या अटकेनंतर भाजपच्या माजी मंत्र्याचा सवाल
राज्यातील सक्रिय रुग्ण ५० हजारांच्या खाली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ७५२ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ११ हजार ९६२ वर खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ९७१ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ४७२ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ४ हजार ३९७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ४ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ४ हजार १३८ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- ‘शिवसेनेचीच आहे राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा’
मुंबईत उपचार घेत आहेत ३०७३ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ०७३ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ००८, सिंधुदुर्गात १ हजार ०४६, बीडमध्ये १ हजार ०२१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८४८ इतकी आहे. रायगडमध्ये ७२३ इतके रुग्ण आहेत.
नंदुरबारमध्ये आज एक रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५९४, नांदेडमध्ये ही संख्या ३६ इतकी आहे. जळगावमध्ये ३७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९३ इतकी झाली आहे. अमरावतीत ही संख्या ९१ वर खाली आली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २ वर आली आहे. तसेच, धुळ्यात २१ तर भंडाऱ्यात ६ रुग्ण आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४ सक्रिय रुग्ण आहे. तर नंदुरबारमध्ये आज एक रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- नारायण राणे यांची तब्येत बिघडली; डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी
३,०१,९५५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी २६ लाख ३२ हजार ८१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ३२ हजार ६४९ (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०१ हजार ९५५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.