Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

३२ दिवस टिकेल ह्या फोनची बॅटरी; फक्त ६,४९९ रुपयांमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले

12

चिनी स्मार्टफोन निर्माता ब्रँड आयटेल भारतीय बाजारात आपलं वेगळं स्थान निर्माण करू पाहत आहे. ह्यासाठी कंपनीनं सतत बजेट सेगमेंटमध्ये नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करत असते, जे फिचर महागड्या फोन्समध्ये आढळतात. आता आयटेलनं आपला नवीन लो बजेट फोन itel A05s भारतात सादर केला आहे. हा स्मार्टफोन फक्त ६,४९९ रुपयांमध्ये आला आहे जो एंट्री लेव्हल स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. मोठा बॅटरी बॅकअप तसेच अँड्रॉइड ‘गो’ एडिशन असलेल्या फोनची संपूर्ण माहिती पुढे वाचता येईल.

itel A05s ची किंमत

itel A05s चा एकमेव मॉडेल लाँच करण्यात आला आहे, ज्यात २जीबी रॅमसह ३२जीबी स्टोरेज मिळते. ह्या हँडसेटची किंमत ६,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन नेब्युला ब्लॅक, मीडॉव ग्रीन, क्रिस्टल ब्लू आणि ग्लोरियस ऑरेंज अशा रंगात विकत घेता येईल.

हे देखील वाचा: तुमच्या हातातील WhatsApp मध्ये आता AI चा शिरकाव; तुम्ही म्हणाल तसे स्टीकर्स बनवून देणार

itel A05s चे स्पेसिफिकेशन्स

आयटेल ए०५एस स्मार्टफोन ७२० × १६१२ पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.६ इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. एचडी+ डिस्प्ले आहे जो इनसेल आयपीएस पॅनलवर बनला आहे. ही स्क्रीन ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १२०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि २७० पीपीआय डेन्सिटीवर चालते.

itel A05s मध्ये प्रोसेसिंगसाठी यूनिसोक स्प्रेडट्रम ९८६३ए चिपसेट देण्यात आला आहे. हा एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो १.६गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो. फोन २जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून १टीबी पर्यंत वाढवता येते.

हा आयटेल स्मार्टफोन अँड्रॉइड १३ गो एडिशनवर लाँच करण्यात आला आहे. ‘गो’ एडिशन असल्यामुळे या फोनमध्ये Google Go apps डाउनलोड आणि इन्स्टाल करता येतील, जे कमी रॅमवर देखील स्मूद प्रोसेस करतात आणि इंटरनेट व बॅटरी कमी वापरतात.

फोटोग्राफीसाठी itel A05s च्या बॅक पॅनलवर ५ मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फेस अनलॉक फीचर देखील आहे. या फोनमध्ये ३.५एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो.

हे देखील वाचा: Apple चं देतंय iPhone 15 वर हजारोंची सूट; Mac, iPad आणि Airpod देखील मिळणार स्वस्तात

पावर बॅकअपसाठी आयटेल ए०५एस मध्ये ४,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीनं असा दावा केला आहे की हा मोबाइल एकदा फुल चार्ज केल्यावर ३२ दिवसांचा स्टँडबाय टाइम किंवा ११२ तास मीडिया प्ले टाइम देऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.