Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple चा स्वस्त iPad उद्या होणार लाँच? तीन मॉडेल होऊ शकतात लाँच

7

Apple नं गेल्या महिन्यात iPhone 15 सीरीज ग्लोबली लाँच केली होती. आता टेक कंपनी स्वस्त iPad लाँच करण्याची तयारी करत आहे. ह्या अपकमिंग आयपॅडमध्ये मिड रेंज प्रोसेसर मिळू शकतो. तसेच, आयपॅडमध्ये एचडी डिस्प्ले सह मोठी बॅटरी मिळू शकते. कंपनीनं आतापर्यंत आयपॅडच्या लाँच बाबत कोणतीही माहिती दिली नाही, परंतु ह्यावेळी तीन मॉडेल लाँच केले जाऊ शकतात.

१७ ऑक्टोबर येतील नवीन iPad

९टू५ मॅक च्या रिपोर्टनुसार, अ‍ॅप्पल १७ ऑक्टोबरला ऑनलाइन इव्हेंट दरम्यान iPad Air, iPad mini आणि आयपॅडचे बेस मॉडेल सादर करू शकते. ह्या तिन्ही आयपॅडच्या डिजाइनमध्ये थोडेफार बदल दिसतील. त्याचबरोबर नवीन आयपॅडमध्ये नवीन चिप आणि एचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच तिन्ही टॅबलेट्स मध्ये मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा: ३२ दिवस टिकेल ह्या फोनची बॅटरी; फक्त ६,४९९ रुपयांमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले

कमी किंमतीची मॉडेल देखील येऊ शकतो

रिपोर्टमध्ये सांगण्यात ऑल आहे आहे की आगामी आयपॅड सीरीजची किंमत बजेट रेंजमध्ये ठेवली जाऊ शकते. हे डिवाइस नवीन कलर ऑप्शनसह सादर केले जाऊ शकतात. सविस्तर माहितीसाठी उद्याचीच वाट पाहावी लागेल.

जुन्या iPad Air चे स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅप्पलनं गेल्यावर्षी २०२२ iPad Air लाँच केला होता. ह्या टॅबलेटची किंमत प्रीमियम रेंजमध्ये आहे. हा टॅब १० इंचाच्या एलईडी डिस्प्लेसह आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन २३६०×१६४० पिक्सल आहे. टॅबलेटयामध्ये एम१ प्रोसेसर, ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: चांगला कॅमेरा फोन शोधत असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज; Vivo Y200 येतोय भारतात

फोटोग्राफीसाठी ह्यात १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो, जो एचडीआर ३, फोटो जियोटॅगिंग आणि इमेज स्टॅबिलायजेशन सारखे स्पेशल फीचरला सपोर्ट करतो. तसेच, सेल्फीसाठी पण फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. iPad Air मध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी सिंगल चार्जमध्ये १० तासांपर्यंत चालते, असा दावा करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टॅबलेटमध्ये वाय-फाय ६, जीपीएस आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.