Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सोलापूर ग्रामीण
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख (पुणे)
“सीसीटीएनएस प्रणाली”मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची उत्तम कामगिरी.
भारत सरकारच्या ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क ॲण्ड सिस्टीम प्रकल्प राबवण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्र राज्यात तिसरे व कोल्हापूर परिक्षेत्रात अव्वल ठरले आहे.
१५ सप्टेंबर २०१५ पासून सीसीटीएनएस प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कायान्वित करण्यात आले आहे. पोलीस दलामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपास व नियंत्रण ही महत्त्वाची कामे करावी लागतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे. यापूर्वी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते परंतु आजच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे प्रमाणात मोठी वाढ झालेली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी आधुनिक तंत्र पद्धतीचा वापर करून क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्मार्ट पोलिस यंत्रणा सज्ज झालेली आहे. ऑनलाईन कार्यप्रणालीला गती येण्याकरिता अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेण्यात येतो. सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे ऑगस्ट २०२३ मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात “तृतीय क्रमांक” व कोल्हापूर परिक्षेत्रमध्ये “प्रथम क्रमांक” मिळवून महाराष्ट्र राज्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नावलौकिक झाले आहे.
या उत्तम कामगिरीबद्दल सीसीटीएनएस प्रकल्पाचे कामकाज पाहणारे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, पोलीस हवालदार इकबाल शेख, फिरोज तांबोळी, संजय सावळे यांचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक 17/10/2023 रोजी पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले आहे. सदर वेळी मा. हिंमत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती विजया कु्र्री उपअधीक्षक मुख्यालय, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व शाखा/पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यासह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाज पाहणारे अंमलदार यांचेवर कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव केला.