Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किंमत आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी ए०५एस चा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. ह्या हँडसेटमध्ये ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मिळते. कंपनीनं गॅलेक्सी ए सीरिजमधील ह्या नव्या मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये ठेवली आहे.
Samsung Galaxy A05s चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए०५एस स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० ४जी ला सपोर्ट देण्यात आला आहे, जो ६नॅनोमीटर आधारित आहे. फोन अड्रेनो जीपीयूला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टम सह वनयुआय कस्टम स्किन मिळते.
हे देखील वाचा: नवीन X अकाऊंट बनवण्यासाठी द्यावे लागणार पैसे; दरवर्षी रिन्यू करावं लागणार सब्सस्क्रिप्शन
Samsung Galaxy A05s स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १०८०x२४०० पिक्सल रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. ही स्क्रीन ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोन ५००० एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे, जी २५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
हे देखील वाचा: जबरदस्त अॅडव्हान्स फिचरसह HP नं लाँच केले दोन लॅपटॉप; Pavilion Plus 14 आणि Pavilion Plus 16 ची भारतात एंट्री
हा एक ४जी कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन आहे. ज्यात वाय-फाय, ड्यूल बँडला सपोर्ट आणि ब्लूटूथ ५.१ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. फोनची जाडी ८.८मिमी आहे. तर वजन १९४ ग्राम आहे. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. फोन तीन कलर ऑप्शन ब्लू, लाइट ग्रीन आणि लाइट पर्पल मध्ये विकत घेता येईल.