Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Curve Buds Pro आणि Curve Max ची किंमत
BOULT Curve Buds Pro तुम्ही १,२९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता, ज्याची रिटेल प्राइस १,७९९ रुपये आहे. हे अॅमेझॉनसह कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच Curve Max ची रिटेल किंमत १,२९९ रुपये आहे परंतु हे ९९९ रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेता येईल.
हे देखील वाचा: एकदा खरेदी करा आणि चार वर्ष विसरून जा; Samsung Galaxy A05s भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
BOULT Curve Buds Pro चे स्पेसिफिकेशन्स
कंपनीनुसार, गेमर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ह्यात १०० तास नॉनस्टॉप गेमप्ले मिळेल. लाइटनिंग बोल्ट टाइप-सी फास्ट चार्जिंगसह फक्त १० मिनिटांत याची बॅटरी १३० तासांचा प्लेटाइम देऊ शकते. ह्यात क्रिस्टल क्लियर कॉलिंगचा एक्सपीरियंस मिळेल. त्याचबरोबर ZEN™ Quad Mic ENC फीचर देखील देण्यात आलं आहे. ह्यात १०मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत जे BoomX™ टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्याचबरोबर हायफाय, रॉक आणि बेस बूस्ट मोड देण्यात आले आहेत. हा स्लीक लुकसह येतो. ह्यात गेमिंग मोड आहे जो ४०ms लेटेंसी ऑफर करतो. हा IPX5 वॉटर रेजिस्टंटसह येतो.
हे देखील वाचा: १२ हजारांत १२ जीबी रॅम; ६००० एमएएचच्या बॅटरीसह स्वस्त HONOR Play 8T लाँच
BOULT Curve Max चे फीचर्स
हा लाइटनिंग बोल्ट टाइप-सी फास्ट चार्जिंगसह फक्त १० मिनिटांत याची बॅटरी २४ तासांचा प्लेटाइम देऊ शकते. कंपनीनं सांगितलं आहे की याची ऑडियो क्वॉलिटी खूप चांगली आहे आणि ह्यात १३मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे BoomX™ टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. सिंगल चार्जमध्ये हे १०० तासांची बॅटरी लाइफ देतात. ह्यात ५०ms लेटेंसी गेमिंग मोड देण्यात आला आहे. तसेच ZEN™ Mode ENC फीचर देखील आहे. त्याचबरोबर IPX5 वॉटर रेजिस्टंट देखील आहे. हा ड्युअल डिवाइस कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंग क्षमतेसह येतो.