Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nokia च्या सर्वात स्वस्त 5G Phone वर जबरदस्त सूट; मर्यादित कालावधीसाठी अ‍ॅमेझॉनवर ऑफर

9

Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आता सुरु आहे. ह्या सेल दरम्यान अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत परंतु रोज Deal Of The Day दिला जात आहे. यावेळी Nokia G42 5G फोनवर धमाकेदार ऑफर्स दिली जात आहे त्यामुळे फोन अत्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. हा फोन एक्सचेंज ऑफरसह EMI वर देखील विकत घेता येईल. चला जाणून घेऊया ह्या फोनवर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

Nokia G42 5G वरील ऑफर्स

ह्या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. त्यावर २२ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे फोन १२,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर तुम्ही हा फोन EMI वर खरेदी केला तर दरमहिन्याला ६०६ रुपये देऊन विकत घेता येईल. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला १,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल.

हे देखील वाचा: BOULT Curve Buds Pro आणि Curve Max लाँच, किंमत ९९९ रुपयांपासून सुरु

तसेच तुमच्याकडे एखादा जुना फोन असेल तर तुम्हाला ११,८७४ रुपये पर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. ही ऑफर तुमच्या फोनच्या स्तिथीवर अवलंबून असेल. जर संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा फोन ६२५ रुपयांमध्ये मिळेल.

Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्याचे पिक्सल रेजोल्यूशन ७२० x १६१२ आहे. सोबत ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ५जी प्रोसेसरसह आला आहे. ह्यात ६ जीबी रॅम मिळतो जो आणखी ५ जीबी पर्यंत वाढवता येतो. सोबत कंपनीनं १२८ जीबीची स्टोरेज दिली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा एआय ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात दोन सेन्सर २ मेगापिक्सलचे आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. ह्यात अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टम आहे.

हे देखील वाचा: OnePlus चा सर्वात पहिला फोल्डेबल फोन आज येतोय भारतात; अशाप्रकारे बघता येईल लाइव्ह इव्हेंट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.