Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; उच्च शिक्षणाच्या विविध क्षेत्रातील संधीचे दालन होणार खुले
(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील विविध उच्च शिक्षण संस्था, औद्योगिक, व्यावसायिक संस्थांचे विविध प्रतिनीधी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्व विशद करून या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विविध उच्च शिक्षण संस्थांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यासाठी उचलेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या शैक्षणिक सामंजस्य करारांची पार्श्वभूमी विशद करताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवीद्र कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, कृत्रिम बुद्धीमत्ता, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे.
(वाचा : Mumbai University चा कार्बन न्युट्रल ग्रीन कँपससाठी पुढाकार; पहिल्या टप्प्यात विद्यानगरी संकुलासाठी योजना तयार)
त्याचबरोबर, उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातूनही या करारांचे महत्व अधोरेखित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे आयोजित ‘अखिल भारतीय शिक्षा समागम २०२३’ या कार्यक्रमात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केले होते.
सामंजस्य करार करण्यात आलेल्या संस्थामध्ये ८ परदेशी विद्यापीठे, युरोपीयन कंसोर्सियामधील ७ विद्यापीठे, १० औद्योगिक संस्था, ५ शासकीय संस्था, ३ राज्ये विद्यापीठे, आयआयटी मुंबई, सेक्टर स्कील काँऊंसिल, स्टार्टअप, एनजीओ अशा विविध नामांकित संस्थांचा यामध्ये समावेश आहे.
पर्ड्यू विद्यापीठ, सेंट लुईस विद्यापीठ, मॉरिशस कल्चरल सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बन, बोलग्ना, मलहाऊस डाकर, स्ट्रासबर्ग, गोएथे युनिव्हर्सिटी जर्मनी, ट्रायस युनिव्हर्सिटी फ्रांस, इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, प्राइस वॉटरहाउस कुपर, रिटेलर्स असोसिएशन स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, सासमीर, समीर, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, आयसीसीआर, फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बार्टी, सीआयडीएम, स्वामीनारायण एकेडमिक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, वृंदावन गुरुकुल, ओटीएआय, द कलर सोसायटी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर आणि ठाणे, गो शुन्य यासारख्या विविध नामांकित संस्थांबरोबर करार करण्यात आले. मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी आयसीसीआर सोबत करण्यात आलेल्या कराराचे महत्व अधोरेखित होणार आहे.
(वाचा : Mumbai University च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा पहिला नंबर)