Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एनआयएफटीसाठी अर्ज प्रक्रियेला या दिवसापासून सुरुवात; संपूर्णता ऑनलाइन पार पडणार निवड प्रक्रिया

11

NIFT 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) लवकरच देशातील फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, इच्छुक उमेदवार nift.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. सदर प्रवेशांसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि पायर्‍यांविषयी साविसतर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, National Institute of Fashion Technology मधील प्रवेशांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा NIFT च्या वतीने करण्यात आलेली नाही.

(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्‍याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)

NIFT प्रवेश परीक्षा 2024 साठी अर्ज प्रक्रियेमध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश असेल. ज्यामध्ये नोंदणी, फी भरणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने समाविष्ट असतील. उमेदवारांना त्यांची कागदपत्रे तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून ते नोंदणी सुरू झाल्यानंतर लगेच अर्ज करू शकतील. कारण अर्जादरम्यान उमेदवारांना संबंधित कागदपत्रांचीही आवश्यकता भासणार आहे.

NIFT 2024 साठी अर्ज करण्यासाठी :
पायरी 1: सर्वप्रथम NIFT च्या अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जा.
पायरी 2: तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि फोन नंबर यासारखी माहिती देऊन NIFT 2024 फॉर्म भरा.
पायरी 3: तुमची आवश्यक प्रमाणपत्रे आणि आवश्यक शैक्षणिक माहितीसह अर्ज भरा.
पायरी 4: NIFT 2024 प्रवेश परीक्षेसाठी तुमचे इच्छित परीक्षा केंद्राची निवड करा.
पायरी 5: फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आकारात आणि फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
पायरी 6: NIFT 2024 अर्ज भरा, अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
पायरी 7: भविष्यातील नोंदींसाठी NIFT 2024 अर्जाची प्रत डाउनलोड करा.

अशी पार पडेल निवड प्रक्रिया :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसावे लागेल. यानंतर यशस्वी उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा कटऑफ प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर हे विद्यार्थी देशातील NIFT संस्थांमध्ये फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

अर्ज शुल्काविषयी :
अनारक्षित श्रेणी आणि SC, ST आणि PWD अर्जदारांसाठी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज शुल्क अनुक्रमे ,रुपये आणि १,५०० रुपये असेल.

या अभ्यासक्रमांमध्ये NIFT स्कोअरच्या आधारे प्रवेश दिला जातो :
NIFT स्कोअरच्या आधारे, बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des), बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (BFTech), मास्टर ऑफ डिझाइन (M.Des), मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट यांसारख्या डिझाइन अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल.

(वाचा : BHEL Recruitment 2023: बीएचईएलमध्ये विविध पदांच्या तब्बल ७५ जागांसाठी भरती; २५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.