Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई (Maharashtra State Textile Corporation Ltd., Mumbai) मधील वरिष्ठ सल्लागार या पदाकरिता कंत्राटी पद्धतीने ६ महिन्याकरिता दरमहा व्यावसायिक फी तत्त्वावर ही भरती करण्यात येणार आहे.
(वाचा : Railway Recruitment 2023: १०वी आणि आयटीआय पास ते थेट पदवीधरांसाठी नोकरीची संधी; भारतीय रेल्वेत खेळाडूंसाठी भरती)
पदभरतीचा तपशील :
संस्था : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई
भरले जाणारे पद : वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग)
पद संख्या : १ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ नोव्हेंबर २०२३
निवड प्रक्रिया : मुलाखती
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
असा करा अर्ज :
- MSTCL Mumbai मधील वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग) पदाच्या या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- मूळ जाहिरात वाचून उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- मुख्य अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह उमेदवाराने ३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ४ वाजेपर्यंत खलील पत्यावर पाठवणे (कार्यालायत) जमा असणे आवश्यक आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, कार्यालय क्र. १, तळमजला, रेवा चेंबर्स, ३१, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरिन लाईन्स, मुंबई ४००००१
महत्त्वाचे :
- महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई येथील वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार वस्त्रोद्योग विभागातील उपसचिव पदावरील सेवानिवृत अधिकारी असून त्याचे वय ६२ वर्षांपर्यंत असावे.
- या भरतीच्या माध्यमातून निवड होणार्या उमेदवारला सुरूवातीला ६ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने दरमहा व्यावसायिक फी दिली जाईल.
- प्राप्त अर्ज आणि कागदपत्रानुसार किमान अहर्ताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळ आणि दिनांक दिलेल्या अर्जावरील मोबाइल नंबर वर फोन करून आणि ईमेल च्या माध्यमातून कळवले जाईल.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. undefined
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. undefined
undefinedundefined(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)