Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परदेशात मोठ्या पगारची नोकरी हवीय, तर ‘या’ भाषा जरूर शिका

10

आपणही परदेशात जाऊन नोकरी करावी, भरपूर पैसे कमवावे, अनेक देश फिरावे असे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. त्यात करिअरच्या संधी इतक्या विस्तारत आहेत की आता नोकरीसाठी सहज आपण परदेशात जाऊ शकतो. पण तिथे जायचे म्हणजे डॉक्टर, इंजिनीअर आणि अन्य ठराविक क्षेत्रातच करिअर करायला हवे असे नाही. अगदी आपण ‘भाषा’ या विषयात शिक्षण घेऊनही परदेशात मोठ्या पगारची नोकरी मिळवू शकतो.

सध्या ‘भाषा’ या विषयावर एवढे संशोधन आणि करिअरचे पर्याय उपलब्ध झाले आहेत की भाषेला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता परदेशात काम करायचे म्हणजे केवळ इंग्रजी याला हवी असे नाही. काही देश असे आहेत जिथे आजही इंग्रजी पेक्षा त्यांच्या प्रांत भाषेचा वापर व्यवहारात केला जातो. जर त्या भाषांचे शिक्षण घेतले, तर आपणही परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवू शकतो.

विशेष म्हणजे या भाषांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे शिक्षण आता भारतासह राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये दिले जात आहे. तेव्हा पाहूया ‘या’ भाषा नेमक्या कोणत्या आहेत ते.

स्पॅनिश: स्पॅनिश ही जागतिक स्तरावरील लोकप्रिय भाषा मानली जाते. तसेच युरोपिय राष्ट्रांमध्येही स्पॅनिश भाषेला विशेष प्राधान्य दिले जाते. ही भाषा शिकल्यास मोठमोठ्या कंपन्यांसह तुम्ही दुभाषिक म्हणूनही काम करू शकता. तसेच पर्यटन, परराष्ट्र सेवा, भाषांतरकार, आयात निर्यात उद्योग व्यवसाय यामध्येही अनेक संधी आहेत.

(वाचा: Maha Metro Recruitment 2023: महाराष्ट्र मेट्रोमध्ये अप्रेंटीस पदासाठी मोठी भरती; आजच करा अर्ज)

फ्रेंच: फ्रेंच ही भारतीयांची प्रिय भाषा आहे. भारतात अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी फ्रेंच भाषेचे शिक्षण घेत आहेत. फ्रेंच भाषा जगातील पाच खंडांच्या तीस हून अधिक देशांमध्ये बोलली जाते. विशेष म्हणजे इंग्रजी भाषेनंतर जगात सर्वात वाचली जाणारी ही भाषा आहे. या भाषेचे शिक्षण घेतल्यास कॉर्पोरेट सेक्टरमधल्या अनेक नोकर्‍या उपलब्ध होतात. तसेच पर्यटन, फॅशन, शिक्षण, ऑटोमोटिव्ह आणि अन्य अनेक क्षेत्रात संधी आहेत.

जर्मन: सध्या जर्मन भाषा शिकण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. जगातील महत्वाच्या भाषांमध्ये या भाषेचा समावेश होतो. जर्मन भाषा जर्मनी, ऑस्टेलिया आणि स्वित्झर्लंड आदी. युरोपियन देशांमध्ये बोलली आहे. जर्मनी हे सध्या आर्थिक दृष्ट्या सबल राष्ट्र मानले जाते. जर्मनीमध्ये अनेक मात्तबर कंपन्या आणि बीएमडब्ल्यू, सीमेंस, डॅमलर, फोक्सवॅगन सारखे ब्रॅंड विस्तारले आहेत. त्यामुळे अशा देशांमध्ये करिअर करण्यासाठी जर्मन येत असेल तर अनेक संधी उपलब्ध होतात.

चायनीज/ मांदरीन: जगाला चायनीज बाजारपेठेने वेढा घातला आहे असे म्हणाला हरकत नाही. भारतात तरी चायनीज वस्तूंचा प्रचंड बोलबाला आहे. त्यामुळे व्यापार आणि परदेशी व्यवहार या दृशीने चायना येथील मांदरीन ही भाषा अत्यंत महत्वाची आहे. जगातील एक अब्जाहून अधिक लोक ही भाषा बोलतात. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आज चायना मध्ये आहेत. त्यामुळे ही भाषा करिअरच्या दृष्टीने महत्वाची आहे.

जॅपनीज: जपानची ही भाषा देखील जागतिक स्तरावर नावाजली केली आहे. तुम्ही संशोधन, इतिहास, मानववंशशास्त्र आदि विषयातून पदवीधर असला आणि ही भाषा अवगत असेल तर तेथील सांधोधान कार्यात तुम्हाला मोठा वाव आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात जपानने मोठी प्रगती केली आहे. भारत आणि जपान यांच्यामध्ये सध्या अनेक करार होत असून व्यावसायिक दृष्ट्या अनेक संधी या माध्यमातून खुल्या होत आहेत.

(वाचा: Career In Science Stream: विज्ञान शाखेतील PCB आणि PCM म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील करिअरच्या संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.