Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे विद्यापीठ आघाडीवर; BA, BCom, BSc अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा नवा अभ्यासक्रम तयार

11

Pune University has taken the lead in implementing the NEP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) राबविण्यासाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पदवीच्या पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १५ नोव्हेंबरपूर्वी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे विद्यापीठाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

सध्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केवळ स्वायत्त महाविद्यालयांत सुरू आहे. मात्र, पुढील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांत शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या सध्या ८००च्या आसपास आहे. या महाविद्यालयांत शैक्षणिक धोरणाची अंमलबाजवणी करण्यासोबतच चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाच्या बैठकांत विविध पदवी अभ्यासक्रमांचा प्रथम वर्षाचा सिलॅबस तयार करण्याबाबत चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक टप्प्यात बीए, बी-कॉम, बीएस्सी अशा प्रामुख्याने विद्यार्थीसंख्या अधिक असणाऱ्या अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानुसार या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा सिलॅबस तयार करण्यात आला आहे.

(वाचा : CUET 2024 Updates: पुढील वर्षापासून CUET मध्ये मोठे बदल होणार, विषय निवडीच्या संख्येवर मर्यादा येणार; काय आहे नवीन निर्णय)

येत्या काही दिवसांत हा Syllabus विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या माहितीसाठी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत इतर पदवी अभ्यासक्रमांचाही अशाच पद्धतीने सिलॅबस प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

सिलॅबस लवकरच विद्यापीठाच्या वेबसाइटवर :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम निर्मितीच्या दृष्टीने अभ्यास मंडळांच्या बैठका होत आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा सिलॅबस येत्या काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर इतर पदवी अभ्यासक्रमांचे सिलॅबसही विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येतील.
– डॉ. पराग काळकर( प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

अभ्यासक्रम भविष्यवेधी असावा :

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम भविष्याचा वेध घेणारा व्हायला हवा. त्यासाठी तो नाविन्यपूर्ण पद्धतीने आखला गेला पाहिजे. जुन्याच अभ्यासक्रमाला रंगरंगोटी करून, तो विद्यापीठांनी प्रसिद्ध करणे अपेक्षित नाही. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार, संशोधन आणि करिअरच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, अशी भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

(वाचा : JEE Main 2024: जेईईच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल; पुढील आठवड्यापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.