Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जेईई मेन २०२४ च्या अभ्यासक्रमाविषयी महितीसाठी येथे क्लिक करा
१३ भाषांमध्ये घेतली जाणार परीक्षा :
एनटीएच्या सूचनेनुसार, इंग्रजी, हिंदी आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या १३ भाषांमध्ये परीक्षा घेतली जाईल.
(वाचा : JEE Main 2024 Updates: ५ नोव्हेंबरपासून होणार जेईई परीक्षेची अर्ज नोंदणी प्रक्रिया? हे असेल संभाव्य वेळापत्रक)
उमेदवार JEE (मुख्य) – 2024 साठी दोन सत्रांमध्ये (सत्र १ आणि सत्र २) अर्ज करू शकतात आणि वेळापत्रकानुसार परीक्षा शुल्क भरू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर उमेदवारांना फक्त सत्र १ साठी अर्ज करायचा असेल तर त्यांना सध्याच्या अर्जादरम्यान सत्र १ साठी परीक्षा शुल्क भरावे लागेल. सत्र 2 (April 2024) साठी अर्जाची सूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल.
परीक्षा पद्धती :
जेईई मेन २०२४ साठी तीन पेपर असतील. B.Tech आणि BE साठी पेपर-१ असेल. तर पेपर-२ बी.आर्चसाठी असेल. तर, पेपर-३ बी.प्लॅनिंगसाठी असेल. सर्व पेपर्सची परीक्षा २ शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल. तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडेल.
JEE Main 2024 साठी अर्ज करण्यासाठी :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
– फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
– Final Submit वर क्लिक करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)