Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उत्तम पगार मिळवून देणार्‍या ‘बीबीए’ कोर्स विषयी जाणून घ्या सविस्तर माहिती; ‘या’ आहेत संधी

10

Career Opportunities In Bachelor of Business Administration:बिझनेस मॅनेजमेंट कोर्सची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात आहे. या क्षेत्रातील संधी विस्तारत असल्याने विद्यार्थ्यांची या कोर्सला पसंती आहे. याच बिझनेस मॅनेजमेंटची पहिली पायरी आहे ‘बीबीए’ कोर्स. बारावी नंतर असलेल्या या कोर्सला अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. शिवाय या कोर्समधून मिळणार्‍या संधीही उत्तम असल्याने बारावी नंतर जर काय करायचे असा प्रश्न असेल तर या कोर्सचा तुम्ही नक्की विचार करू शकता.

तुम्हाला व्यवसाय, अर्थकारण, मार्केटिंग या विषयांची आवड असेल तर बीबीए हा त्यातलाच एक करिअरचा पर्याय आहे. केवळ नोकरीच नाही तर बिझनेस सल्लागार किंवा स्वतः उद्योजक होण्याची संधी या कोर्समधून तुम्हाला मिळू शकते. तुम्ही कला, वाणिज्य किंवा विज्ञान अशा कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हा कोर्स तुम्ही निवडू शकता. पण आजही या कोर्स विषयी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत. हा कोर्स नक्की फायदेशीर आहे का, असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून येतात. म्हणूनच या कोर्सविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बीबीए कोर्स विषयी: ‘बीबीए’ या शब्दाची फोड आहे ‘बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (Bachelor Of Business Administration). व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत असलेला हा तीन वर्षांचा आणि एकूण ६ सत्र परीक्षांचा ग्रॅज्युएशन कोर्स आहे. ही बॅचलर पदवी तुम्ही कोणत्याही शाखेतील बारावी नंतर करू शकता. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.

(वाचा: Mira Bhayandar महानगरपालिकेत आरोग्य विभागात मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

‘बीबीए’ मध्ये नेमके काय आहे: हा अभ्यासक्रम व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा गाभा समजून घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करतो. कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक असलेले व्यावसायिक ज्ञान या कोर्सच्या माध्यमातून दिले जाते. ‘एमबीए’ जसा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे. तसाच बीबीए हा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे. अर्थ ज्ञान, नेतृत्व, व्यवहार, व्यवसाय याचे उत्तम प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते.

बीबीए अभ्यासक्रम: ‘बीबीए’ हा तीन वर्षांचा सहा सत्रांमध्ये होणारा पदवी अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये फायनान्स, मार्केटिंग, व्यावसायिक व्यवस्थापन, मार्केटींग, बिझनेस प्लान, बँकिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे अनेक विषय अभ्यासले जातात. ही ‘एमबीए’ ची पहिली पायरी आहे असेही म्हणणे वावगे ठरणार नाही. हा कोर्स सरकारी तसेच खासगी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये माफक दरात शिक्षण दिले जाते. खासगी महाविद्यालयांमध्ये या कोर्सची फी एक ते दोन लाख इतकी आहे.

या विषयात करू शकता स्पेशलायजेशन:
बीबीए फायनान्स (BBA Finance)
बँकिंग आणि विमा(BBA in Banking and Insurance)
बीबीए माहिती तंत्रज्ञान (BBA Information Technology)
बीबीए मानव संसाधन (BBA Human Resource)
बीबीए मार्केटिंग (BBA Marketing)
बीबीए कम्युनिकेशन आणि मीडिया मॅनेजमेंट (BBA Communication and Media Management)
बीबीए फॉरेन ट्रेड (BBA Foreign Trade)
बीबीए हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट (BBA Hospitality and Hotel Management)
बीबीए हॉस्पिटल आणि हेल्थकेअर व्यवस्थापन (BBA Hospital and Healthcare Management)

बीबीए कोर्सचे फायदे: ‘बीबीए’ अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा विकास होतो. तसेच जागतिक स्तरावरचे व्यवसायिक ज्ञान त्यांना अवगत होते. या कोर्स नंतर तुम्ही उद्योग, व्यवसाय, नोकरी अशा कोणत्याही क्षेत्रात सहज काम करू शकता. शिवाय लेखा, उद्योजकता, विपणन, संस्थात्मक व्यवस्थापन, वित्त, आंतरराष्ट्रीय व्यवसाय याचे सखोल ज्ञान देणारा हा कोर्स आहे.

बीबीए नंतरच्या संधी: या कोर्सनंतर तुम्ही ‘एमबीए’ च्या माध्यमातून पदव्युत्तर पदवी घेऊन अधिक उच्च शिक्षण घेऊ शकता. तसेच तुमच्या स्पेशलायजेशन नुसार मार्केटिंग, फायनान्स, टुरिझम, बँकिंग, एचआर अशा कोणत्याही क्षेत्रात सहज नोकरी मिळवू शकता. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या ‘बीबीए’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी देतात. शिवाय तुम्ही व्यवसाय सल्लागार म्हणून देखील मोठ्या कंपन्यांसोबत काम करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय देखील करू शकता. ‘बीबीए’ उत्तीर्ण उमेदवार आज लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवत आहेत.

(वाचा: Career In Nursing: नर्सिंग मध्ये करिअर करायचे आहे? मग जाणून घ्या त्यातील कोर्सेस आणि खास संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.