Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कम्प्युटरची आवड आहे? मग ‘बीसीए’ मध्ये करा करिअर; भविष्य बदलेल..

13

Career Opportunities In BCA Course: करिअर निवडीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना अनेक सायास करावे लागतात. कारण हल्ली इतके पर्याय वाढले आहेत की कोणत्या क्षेत्रात जावे आणि कुठे जाऊ नये अशी अवस्था होते. अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना शालेय जीवनापासूनच कम्युटरची प्रचंड आवड असते. एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे त्यातल्या अनेक तांत्रिक बाबी त्यांना ठाऊक असतात. पण अशावेळी चुकीचे मार्गदर्शन मिळते आणि या विद्यार्थ्यांचे करिअर भरकटते.

अनेकांना वाटते कम्प्युटरचे वेड बरे नाही, त्यात काय करिअर करणार. पण हेच वेड त्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये कामावून देऊ शकते, जर त्यांचे शिक्षणही त्याच दिशेने झाले तर. म्हणूनच तर तुम्हाला कम्प्युटरची आवड असेल तर ‘बीएससी’ हा बारावी नंतरचा सर्वोत्तम करिअरचा पर्याय आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात झपाट्याने बदल घडत आहेत. डिजिटल क्षेत्रात तर क्रांती घडत आहे. अशात जर आपल्यालाही आपल्या कम्प्युटरच्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी कारून दाखवयाचे असेल तर या विद्यार्थ्यांनी जरूर ‘बीसीए’ ला प्रवेश घ्या.

आता बीसीए कोर्स म्हणजे नेमके काय, त्याचा अर्थ काय, त्यात काय शिकवले जाते, त्याचे महत्व काय आणि विशेष म्हणजे त्यातून पुढे संधी कोणत्या आहेत हे विस्ताराने जाणून घेऊया.

‘बीसीए’ म्हणजे काय: ‘बीसीए’ हा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये कम्प्युटर क्षेत्राशी संबधित ग्रॅड्युएशन डिग्री तुम्हाला प्राप्त होते यामध्ये कॉम्प्युटर एप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, प्रोग्रॅमिंग लँग्वेज, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, एप डेव्हलपिंग, वेब डेव्हलपिंग याविषयांचे सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या पदवी नंतर तुम्ही अधिक तज्ज्ञता मिळवण्यासाठी ‘एमसीए’ हा कोर्स देखील करू शकता. कम्प्युटर, प्रोग्रामिंग आणि आयटी क्षेत्रात ‘बीसीए’च्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे.

(वाचा: SCI Mumbai Recruitment 2023: मुंबईकरांनो, ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये मोठी भरती; आजच करा अर्ज)

‘बीसीए’ अभ्यासक्रम: हा तीन वर्षांचं पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. ज्याचा फुलफॉर्म ‘बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन’ असा आहे. हा तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असून कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी ‘बीसीए’ करिता प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाची सरकारी महाविद्यालये खूपच कमी आहेत. तर खासगी महाविद्यालयात अंदाजे प्रती सत्र २० ते ५० हजार इतकी या कोर्सची फी आहे.

‘बीसीए’ मध्ये काय शिकवले जाते: ‘बीसीए’ हा कोर्स संगणक आणि तंत्रज्ञान यावर पुर्णपणे आधारलेला असून यामध्ये सॉफ्टवेअर, कम्पुटर नेटवर्क, वेब डिझाइन, कम्पुटर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कम्प्युटर बेसिक याविषयी विस्तृत ज्ञान दिले जाते. ज्यामध्ये प्रॅक्टिकलचा देखील मोठा भाग असतो. एखादा सॉफ्टवेअर विकसित करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, कम्प्युटर नेटवर्कशी संबधित अडचणी दूर करणे, नवे संशोधन करणे, प्रोफेशनल वेबसाइट बनवणे, मोबाईल ऍप्लिकेशन तयार करणे यासह अनेक सूक्ष्म गोष्टींचे ज्ञान दिले जाते.

‘बीसीए’ मधील करिअरच्या संधी:

  • या कोर्स नंतर तुम्हाला सरकारी आणि निमसरकारी तसेच खासगी कंपन्यांमध्ये अनेक नोकर्‍या उपलब्ध आहेत. या क्षेत्रात पगारही भरपूर दिला जातो.
  • तुम्ही तुमच्या ज्ञानावर आणि संशोधनावर फ्री लांसर म्हणून देखील काम करू शकता आणि मनासारखे पैसे मिळवू शकता.
  • या खेरीच सध्या आयटी क्षेत्रात मोठे बदल होत असल्याने भारतासह परदेशातही अनेक संधी आहेत.
  • ओरॅकल, आयबीएम, इन्फोसिस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, टेक महिंद्रा, विप्रो, एचसीएल, डेल या आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये ‘बीसीए’ उत्तीर्ण उमेदवारांची गरज भासते.
  • तसेच माहिती प्रणाली व्यवस्थापक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, बँकिंग एक्स्पर्ट, अ‍ॅप्लीकेशन तज्ञ, वेब डिझायनर, सिस्टम ऑर्गनायजर, कम्प्युटर प्रोग्रॅमर, डेटाबेस एक्स्पर्ट अशा विविध पदांवर तुम्ही अधिकारी म्हणून काम करू शकता.

(वाचा: MMRCL Recruitment 2023: ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ मध्ये विविध पदांची भरती, आजच अर्ज करा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.