Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड

12

Savitribai Phule Pune University Jobs: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो या पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. तर, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

पदाचे नाव : पुणे विद्यापीठातील या भरती अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) , वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण रिक्त पदसंख्या : ३

शैक्षणिक पात्रता :

कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) :

  • M.E. / M.Tech. in Energy / Mechanical / Electrical / Electronics /Materials Engineering with First Class. किंवा M.Sc. in Physics / Electronics/Instrumentation मध्ये किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • NET/ GATE परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.
  • CSIR नियमांप्रमाणे इतर नियम लागू.

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) :

  • M. Tech. / M. E. or equivalent degree in engineering / technology विषयात किमान ६० टक्के गुण आवश्यक.
  • O&M. Sc. in Physics / Electronics / Instrumentation विषयात किमान ५५ टक्के गुण आवश्यक.
  • science citation indexed (SCl) जर्नलमधील एक प्रकाशन आणि एमएससी नंतर किमान दोन वर्षे पूर्ण केलेली असून, संशोधन अनुभव असावा.
  • CSIR नियमांप्रमाणे इतर नियम लागू.

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

(वाचा : AFMC Recruitment 2023 : पुण्याच्या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती)

मिळणार एवढा पगार :
1)JRF: ३१ हजार रुपये + HRA (as per CSIR norms)
2) SRF: ३५ हजार + HRA (as per CSIR norms)

अर्ज करण्याची पद्धत :

सदर भरती अंतर्गत ऑनलाइन ई-मेलच्या माध्यमातून सादर करायचे आहेत.

पुणे विद्यापीठातील या भरतीसाठी hodenergy@unipune.ac.in आणि energyunipune@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया :

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया :

-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
-पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता :

निवड झालेल्या उमेदवारांना ‘सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११ ००७

(या पत्त्यावर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.)

अधिकृत वेबसाईट :

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज :
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी www.unipune.ac.in संकेतस्थळाला भेट द्या.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

(वाचा : १० वी पास आणि पदवीधरांसाठी Income Tax Department मध्ये नोकरीची संधी; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.