Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर नजर ‘अटेन्डन्स बॉट’ची; राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची १ डिसेंबरपासून ऑनलाइन हजेरी

10

Online Attendance For School Students: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती १ डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यात येणार आहे. स्विफ्टचॅट या मोबाइल अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. त्यामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके) कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यासाठी अटेन्डन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना नुकतेच देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबतचे परिपत्रकात प्रसिद्ध केले आहे.

(वाचा : Western Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत भरती; १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्याला सुरवात)

सदर निर्णयाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी स्विफ्टचॅट मोबाइल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरहून डाऊनलोड करून त्यावरील ‘अटेन्डन्स बॉट’द्वारे ऑनलाइन नोंदवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेन्डन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदवता येईल. उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा युडायस क्रमांक आणि स्वत:च्या शालार्थ क्रमांकाचा वापर करावा, असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

उपस्थितीची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी काही सूचना :
– शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाइल क्रमांक वापरावा. मोबाइल क्रमांक बदलला असल्यास तो शालार्थ वेबसाइटवर अद्ययावत करणे गरजेचे आहे.
– सेवार्थ आणि इतर प्रणालीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील.
– दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी बारा, तर इतर शाळांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेडन्स बॉटवर करायची आहे.
– ऑनलाइन उपस्थिती नोंदवताना येतांना अडचणीही नोंदवता येणार आहे.
– एखाद्या शाळेतील तुकडी विनाअनुदानित असल्यास, त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून नोंदवावी
– चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदवताना शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी.
– विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना अडचणी येत असल्यास शालार्थ, सरल, युडायस वेबसाइटमधील माहिती अद्ययावत करावी.

(वाचा : Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.