Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय टपाल विभागात पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदावर भरती; असा करा अर्ज
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : भारतभरात १ हजार ८९९ त्यातील महाराष्ट्रात २९६ जागा रिक्त
- पोस्टल असिस्टंट
- सॉर्टिंग असिस्टंट
- पोस्टमन
- मेल गार्ड
- मल्टी टास्किंग स्टाफ
(वाचा : SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी भरती; थेट लिंकद्वारे असा करा अर्ज)
शैक्षणिक पात्रता :
पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधील पदवीधर
- कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक
पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी :
- मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून १२ पास असणे आवश्यक.
- कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक
- ज्या भागात काम करण्याची वेळ येईल तिथल्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
- वाहन परवाना असणे आवश्यक.
मल्टी टास्किंग स्टाफ :
- मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दहावी पास असणे आवश्यक
(अधिक महितीसाठी आणि कोणत्या खेळातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
वयोमर्यादा :
० पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे.
० तर, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय १८ ते २५ वर्षांमध्ये असणे आवश्यक आहे.
मिळणार एवढा पगार :
- पोस्टल असिस्टंट (Postal Assistance) : Level 4, २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये
- सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant) : Level 4, २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये
- पोस्टमन ( Postman) : Level 3, २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये
- मेल गार्ड (Mail Guard) : Level 3, २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये
- मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : Level 1, १८ हजार ००० ते ५६ हजार ९०० रुपये
महत्त्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १० नोव्हेंबर २०२३
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ डिसेंबर २०२३
- ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख : ९ डिसेंबर २०२३
- ऑनलाइन अर्जातील चुका दुरूस्तीची तारीख : १० डिसेंबर २०२३ ते १४ डिसेंबर २०२३
अर्जाविषयी महत्त्वाचे :
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये आणि मागास वर्ग आणि प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
महत्त्वाच्या लिंक्स :
भारतीय टपाल विभागातील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Western Railway Recruitment 2023 : पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत भरती; १० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करण्याला सुरवात)