Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
NHM Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान-सातारा येथे विविध पदांच्या ९७ जागांसाठी भरती; आजच करा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
(फोटो : सातारा जिल्हा परिषद अधिकृत वेबसाइट)
पद भरतीचा तपशील :
संस्था : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा
एकूण रिक्त पदे : ९७ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :
स्त्रीरोग तज्ज्ञ : ३० जागा
बालरोग तज्ज्ञ : २९ जागा
भूलतज्ज्ञ : १८ जागा
भिषक : ७ जागा
सर्जन : ३ जागा
इएनटी सर्जन : ३ जागा
रेडिओलॉजिस्ट : ३ जागा
अस्थिरोग तज्ज्ञ : ४ जागा
नोकरी करण्याचे ठिकाण : सातारा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२३
अर्ज शुल्क : ५०० रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- स्त्रीरोग तज्ज्ञ : MD (Gynac) / DGO
- बालरोग तज्ज्ञ : MD Ped / MBBS DCH
- भूलतज्ज्ञ : MD ((Anes) / DA
- मिषक : MD Medicine / DNB
- सर्जन : MS General Surgery / DNB
- इएनटी सर्जन : MS ENT/DORL/DNB
- रेडिओलॉजिस्ट : MD Radiology/DMRD
- अस्थिरोग तज्ज्ञ : M.S. (Ortho)/ D (Ortho)
(वाचा : Thane Police Office Bharti 2023: ठाणे शहर पोलीसमध्ये १४ जागांवर भरती; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात)
मिळणार एवढा पगार :
स्त्रीरोग तज्ज्ञ –
असिस्टेड डिलेव्हरी रु.१५००/- प्रती केस
मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
मायनर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
सोनोग्राफी रु.४००/- प्रती केस
बालरोग तज्ज्ञ –
मेजर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
इर्मजन्सी ऑनकॉल बेसीसरु. १,०००/- प्रती केस
भूलतज्ज्ञ –
मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
Stand By रु.२०००/- प्रती केस
भिषक –
इर्मजन्सीज (क्रिटिकल केसेस) रु.३,०००/- प्रती केस
इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
प्रीऑनेस्टेटिक चेकअप रु १,०००/- प्रती केस
सर्जन –
मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु. १,०००/- प्रती दिवस
इएनटी सर्जन –
मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
रेडिओलॉजिस्ट-
सोनोग्राफी ४००रु /- प्रती केस
एक्स रे ५० रु /- प्रती केस
सी टी स्कॅन ४०० रु /- प्रती केस
अस्थिरोग तज्ज्ञ –
मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती म
इर्मजन्सी ऑनकॉल १०००/- प्रती दिवस
आवश्यक कागदपत्रे :
NHM Recruitment 2023 मधील जागांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मुळ कागदपत्रांच्या सक्षंकीत केलेल्या छायांकित प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात :
- शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- जन्म तारखेचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
- शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असल्यास अनुभव दाखला.
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
असा करा अर्ज :
1. या पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : Notification PDF
अधिकृत वेबसाईट : https://www.zpsatara.gov.in/
(वाचा : India Post Bharti 2023: इंडिया पोस्टमध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत मोठी भरती; १८९९ जागांवरील विविध पदांवर नोकरीची संधी)