Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सेल्फी विथ माटी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये; १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी चीनचा रेकॉर्ड तोडला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या वतीने मेरी माटी, मेरा देश या उपक्रमांतर्गत ‘सेल्फी विथ माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल, मुंबई विद्यापीठात प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नव्या आवृत्तीचे, ई-बुक आणि ऑडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. संजय शिंदे यांनी प्रकाशित समग्र साहित्याबद्दल माहिती दिली.
(वाचा : Mumbai University News: मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर)
या उपक्रमामध्ये ४० विद्यापीठातील ७ हजार महाविद्यालयातील २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यास प्रोत्साहित करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अभिनंदन करून २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी युवकांना केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.
दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला भेट :
विक्रमविरांची परंपरा महाराष्ट्राला आणि इथल्या मातीला लाभली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान देशभरात राबविण्यात आले. याचाच भाग म्हणून ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणे ही दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मिळालेली भेट आहे. देश प्रेमाच्या या भावनेतून हा उपक्रम यशस्वी करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
चीनचा रेकॉर्ड मोडला :
भारत हा केवळ भूभाग नसून आपण आपल्या देशाला मातेचे स्थान दिले आहे. या अभियानातून देशात मातीची मोठ्या प्रमाणावर पूजा केली. या मातीने आपल्याला स्वातंत्र्यसेनानी दिले. या देशाबद्दल प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात आपल्या मातीबद्दल देशभावनेचे अभियान राबविण्यात आले आणि चीनचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समोर आल्याची भावना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
(वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन; Mumbai University आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार)