Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

CBSE Board Exams 2024 : सीबीएसई दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक दिवाळीनंतर येणार? अंतिम वेळापत्रकात ‘हे’ बदल असणार

12

CBSE 10th-12th 2024 Datasheet : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नुकतीच नोटीस जाहीर केली आहे. ज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १०वी आणि १२वीचे पूर्ण वेळापत्रक बोर्डाने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अहवालामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, बोर्ड दिवाळीनंतर वेळापत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करेल. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील.

अद्याप अधिकारी किंवा परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी वेळापत्रक जाहीर करण्यासाठी कोणतीही तारीख दिलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून त्यांची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकू नये. त्याशिवाय, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की बोर्ड १७ नोव्हेंबर रोजी वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक तपासू शकतील.

(वाचा : Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षा ‘या’ तारखेला; २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर)

मागील वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास, CBSE ने परीक्षेच्या पहिल्या दिवसाच्या सुमारे एक-दिड महिना अगोदर महिने आधी डेटशीट प्रसिद्ध केली होती. बोर्डाने जुलैमध्ये असेही सांगितले होते की या परीक्षा सुमारे ५५ दिवस चालतील आणि १० एप्रिल २०२४ रोजी संपतील. शिवाय, सीबीएसईने इतर परीक्षा नियामक प्राधिकरणांना विनंती केली होती की त्यांनी बोर्ड परीक्षा लक्षात घेऊन तारखा जाहीर केल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांच्या परीक्षेच्या तारखा CBSE बोर्डाच्या परीक्षांशी टक्कर होणार नाहीत.

असे डाउनलोड करा वेळापत्रक :

पायरी 1: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, पायरी 2: दिसत असलेल्या पृष्ठावर, “CBSE इयत्ता दहावी किंवा बारावीची तारीख पत्रक 2024 PDF” ही लिंक निवडा.
पायरी 3: २०२४ च्या परीक्षेच्या तारखांचा PDF दस्तऐवज स्क्रीनवर दिसेल.
पायरी 4: ते तपासा.
पायरी 5: आता PDF डाउनलोड करा आणि प्रिंट तुमच्याकडे ठेवा.

इयत्ता दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि बोर्डाच्या वार्षिक परीक्षा १ जानेवारीपासून सुरू होत आहेत. तर, हिवाळी विभागातील शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

(वाचा : MPSC Exam Time Table: एमपीएससीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिलला)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.