Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयात ४८७ पदांसाठी भरती, मिळणार १ लाखापेक्षा जास्त पगार

10

DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) गट ब आणि क पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत पोर्टल hlldghs.cbtexam.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शुल्क भरण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता:

Directorate General of Health Services मधील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

दहावी / बारावी / आयटीआय / पदवी पदानुसार संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा.

वयोमर्यादा :

  • आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस) मधील विविध पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • SC, ST, OBC यांना वयात सवलत दिली जाईल.
  • एससी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष, Ex-Servicemen करता ३ वर्ष तर, सरकारी अधिकार्‍याला ५ वर्षांची सूट देण्यात येईल.

परीक्षा शुल्क :

  1. सामान्य, OBC, EWS वर्गातील उमेदवारांना ६०० रुपये
  2. शुल्क भरावे लागणार आहे.
  3. SC, ST, महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

(वाचा : PW मध्ये कॉन्टेंट रिव्हयूवर पदावर नोकरीची संधी; ज्यूडिशिएरी कॉन्टेंटच्या पुनरावलोकनाचे काम)पगार:

महिन्याला पदांनुसार १८ हजार रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपयांपर्यंत

निवड प्रक्रिया:

संगणक आधारित परीक्षा
दस्तऐवज पडताळणी

महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : १० नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३
  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३ (रात्री ११:४५ वाजेपर्यंत)
  • ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख : १ डिसेंबर २०२३ (रात्री ११ वाजेपर्यंत)
  • CBT साठी ऑनलाइन Admit Card डाउनलोड करण्याची तारीख : अंदाजे, डिसेंबर २०२३ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
  • Computer Based Examination ची तारीख : डिसेंबर २०२३ च्या दुसर्‍या आठवड्यात
  • CBT च्या निकलाची तारीख : अंदाजे, डिसेंबर २०२३ महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात
  • परीक्षेत उत्तीर्ण होऊन Rank List मध्ये नाव आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी : डिसेंबर २०२३ च्या चौथ्या आठवड्यात

याप्रमाणे अर्ज करा:

  • hlldghs.cbtexam.in या अधिकृत पोर्टलवर जा .
  • मुख्यपृष्ठावरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक असलेली माहिती टाकून नोंदणी करा.
  • लॉगिन वर क्लिक करा आणि इतर माहिती भरा.
  • फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि ठेवा.

Directorate General of Health Services भरतीची मूळ जाहिरात पाहा
(वाचा : ITPO Recruitment 2023: वाणिज्य मंत्रालय आयटीपीओ अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.