Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ झळकणार ग

9

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली माहिती

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

निर्माते मनोज कदम यांच्या ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची गरुडेप

अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगाव’ चित्रपट यापूर्वी झळकला असून जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ झळकणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी जाहीर केलेले आहे . मनोरंजनातून समाज प्रबोधन हे ध्येय घेऊन वाटचाल करणारी  सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट छत्रपती संभाजीनगर चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत व सोलापूरचे जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्राप्त उद्योजक मनोज कदम निर्मित हा चित्रपट आहे.

इफ्फी गोवा येथे फिल्म बझार मध्ये दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायं. ४ वा. ग्लोबल आडगावचे प्रदर्शन मिरामार रिसॉर्ट गोवा क्यूब १ येथे जगभरातील फिल्मप्रेमी आणि तज्ञ लोकांसमोर होणार आहे . तसेच त्यांच्यासाठी विव्हींग रूममध्ये चार दिवस म्हणजे २१ ते २४ नोव्हेबरपर्यंत जगभरातील चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहू शकणार आहेत. या चित्रपटाची निवड ही २९ सिनेमांमधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालयाकडून करून इफ्फी गोवा फिल्म बझार साठी करण्यात आली आहे, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनंटीवार यांनी काही दिवसापूर्वी केली होती.

‘ग्लोबल आडगाव’ या सिनेमामधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशन अशा महत्त्वाच्या विषयावर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेले आहे. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असताना प्रेक्षक आपल्या डोळ्यातील पाण्यांना थांबू शकत नाही अशा अत्यंत भावनिक ,संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आलेला आहे.

प्रेक्षकांना भावनिक करणाऱ्या ‘ग्लोबल आडगाव’या चित्रपटाचे अनेक पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे निर्माता प्रसिध्द उद्योजक मनोज कदम, तर उद्योजक अमृत मराठे सह-निर्माता आहेत.  या सिनेमाला या अगोदर अमेरिका येथील न्यू जर्सी येथील उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला आहे. पुणे इंटनॅशनल फिल्म फेस्टीवल , कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल , मेलबर्न फेस्टिवल असे 11 पेक्षा जास्त नामांकन मिळाले आहेत . या सिनेमामध्ये सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे , फुलचंद नागटिळक , स्नेहल कदम ,वैदेही कदम, गणेश लोहार , मधुकर कर्डक, विद्या जोशी , अभिजित मोरे , सुखदेव मोरे , सुदर्शन कदम,  नयना मोरे अर्चना कदम यांच्यासह  ६०० पेक्षा जास्त कलाकार या सिनेमात आहेत.

प्रख्यात गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गीतांना स्वरसाज चढविला आहे. प्रसिध्द गीतकार डॉ.विनायक पवार, प्रशांत मांडपुवार, अनिलकुमार साळवे यांच्या गीतांना समीक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. प्रशांत जठार, निर्मिती व्यवस्थापक सागर देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, संगीत विजय गावंडे, ध्वनी विकास खंदारे, कला दिग्दर्शन संदीप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डीआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड नृत्य रुपेश पसपुल यांनी केला आहे.

मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’  गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार असून मराठी चित्रपटसृष्टीसाठी तसेच मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचे आभार निर्माते मनोज कदम आणि ग्लोबल आडगाव टीम यांनी मानले आहेत. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्राच्या प्रत्येक चित्रपटगृहात प्रदर्शित होईल अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मनोज कदम यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.