Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोचीन शिपयार्ड भरती अंतर्गत इंजिनीयर्सना नोकरीची सुवर्ण संधी; ‘या’ पदावर भरती सुरु

12

Cochin Shipyard Recruitment 2023: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून डेप्युटी मॅनेजर पदांच्या एकूण ५ जागा भरल्या जाणार आहेत.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड म्हणजेच CSL ने विविध प्रवाहातील उपव्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले असून, मेकॅनिकल, इंस्ट्रुमेंटल, इलेक्ट्रिकल आणि आयटी पदवी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. १५ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवार अधिसूचना तपासू शकतात आणि अधिकृत वेबसाइट cochinshipyard.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : ५

1. डेप्युटी मॅनेजर (मॅकेनिकल) : ०२ जागा
2. डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) : ०१ जागा
3. डेप्युटी मॅनेजर (इंस्ट्रुमेंटेशन) : ०१ जागा
4. डेप्युटी मॅनेजर (आयटी) : ०१ जागा

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाइन

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवारचे किमान ६० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये पदवीधारक असावा.
याशिवाय त्याला ७ वर्षांचा कामाचा अनुभवही आवश्यक आहे.
(पोस्ट नुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्यामुळे कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरतीची मूळ जाहिरात पाहा)

वयोमर्यादा:

या भरतीमध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. यामध्ये ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळणार आहे.

(वाचा : SBI Clerk Notification 2023 : एसबीआयमध्ये लिपिक पदाच्या भरतीची अधिसूचना जाहीर, तब्बल ८७७३ जागांवर नोकरीची संधी)

अर्ज शुल्काविषयी :

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे अर्ज शुल्क नॉन-रिफंडेबल असेल.
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

मिळणार एवढा पगार :

भरती प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवारांना E2 ग्रेड अंतर्गत ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड पद्धत:

उमेदवारांना गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत यातून जावे लागेल. शॉर्टलिस्ट केले असल्यास, उमेदवाराला त्याच्या कामाच्या अनुभवाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देखील द्यावे लागेल.

असा करा अर्ज :

० अर्जदारांनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन (Career – Page CSL, Kochi) टॅबमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य असेल.

० अर्जामध्ये नोंदणी आणि अर्ज सादर करणे (Registration and Submission of application) या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश आहे.

० अर्जदारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत. अर्ज एकदा सबमिट केलेला अर्ज अंतिम असेल.

० अर्जदारांनी ऑनलाइन अर्जातील सर्व नोंदी बरोबर असल्याची खात्री करावी त्यानंतरच अर्ज सबमीट करावे.

० अर्जामधील माहिती चुकीची अथवा खोटी आढलायस सादर अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पातळीवर नाकारले जातील.

० अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

० ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्जदारांनी सॉफ्ट कॉपी/प्रिंटआउट स्वतःकडे ठेवावी.

(वाचा : ITPO Recruitment 2023: वाणिज्य मंत्रालय आयटीपीओ अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.