Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समग्र शिक्षा अभियानांतर्गत भरती, मिळणार २ लाखांपर्यंत पगार

16

Samagra Shiksha Abhiyan Recruitment 2023 : देशाच्या शिक्षण मंत्रालयाने समग्र शिक्षा अभियान प्रकल्पाच्या तांत्रिक सहाय्य गटासाठी (TSG-SSA) विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रधान मुख्य सल्लागार, मुख्य सल्लागार, वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार अशा विविध पदांचा यात समावेश असणार आहे. उमेदवार edcilindia.co.in/TCareers ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही सर्व पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • भारत सरकारच्या समग्र शिक्षा अभियान योजने अंतर्गत उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात किमान ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
  • यासोबतच, उमेदवाराला कामाचा अनुभवही आवश्यक आहे.
  • याशिवाय, पोस्टनिहाय इष्ट पात्रता भिन्न आहेत.
  • पीएच.डी., एमफिल किंवा संशोधन पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

वयोमर्यादा :

वेगवेगळ्या पदांसाठी लागू होणारी कमाल वय भिन्न आहे.

प्रधान मुख्य सल्लागार : ५५ वर्षे
मुख्य सल्लागार : ४५ वर्षे
वरिष्ठ सल्लागार : ४० वर्षे
सल्लागार: ३५ वर्षे

अर्ज शुल्काविषयी :

यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

मिळणार एवढा पगार :

वेगवेगळ्या पदांनुसार उमेदवारांना वेगवेगळे वेतन दिले जाईल.

प्रधान मुख्य सल्लागार – रु १ लाख ५० हजार ते रु. २ लाख रुपये प्रति महिना
मुख्य सल्लागार – रु १ लाख २० हजार ते १ लाख ५० हजार रुपये प्रति महिना
वरिष्ठ सल्लागार – रु १ लाख ते १ लाख २० हजार रुपये प्रति महिना
सल्लागार- रु ८० हजार ते १ लाख रुपये प्रति महिना

असा करा अर्ज :

  • अधिकृत वेबसाइट edcilindia.co.in/TCareers वर जा.
  • येथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तपशील भरून नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • युजर आयडी आणि पासवर्डने लॉग इन करून उमेदवारांना त्यांचा अर्ज भरावा लागेल.
  • यानंतर फॉर्म सबमिट करा. यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

महत्त्वाचे :

अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Cochin Shipyard Limited मध्ये भरती, BE – BTech उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपयांत मासिक वेतन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.