Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शैक्षणिक पात्रता :
- व्यवस्थापक पदासाठी, उमेदवाराने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.
- याशिवाय, व्यवस्थापकीय पदावर १७ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- तर, उपव्यवस्थापक पदासाठी एचआर स्ट्रीममधून पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.
- याशिवाय ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
व्यवस्थापक पदासाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
तर, उपव्यवस्थापक पदासाठी ती ४० वर्षे आहे.
अर्ज शुल्काविषयी :
उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑफलाइन मोडमध्ये सबमिट करावा ज्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
(वाचा : Indian Air Force Jobs 2023: भारतीय वायुसेनेने ३२७ जागांवर भरती; २५० रुपये अर्ज शुल्क आणि १ लाख ७० हजारांहून अधिक पगार)
मिळणार एवढा पगार :
व्यवस्थापक पदासाठीच्या उमेदवारांना महिन्याला ३६, ६०० रुपये ते ६२ हजार २०० रुपये पगार मिळेल.
तर, उपव्यवस्थापक पदासाठी महिन्याला २४ हजार ९०० ते ५० हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
तुम्हाला दिलेल्या लिंकवर जाऊन नोटिफिकेशन ओपन करावे लागेल.
अधिसूचनेच्या शेवटी दिलेला अर्ज डाउनलोड करावा लागेल.
ते भरून पोस्टाद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागेल.
फॉर्म पाठवण्याचा पत्ता :
व्यवस्थापकीय संचालक, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, मुजावर पाखडी रोड, माझगाव, मुंबई ४०००१०.
महत्त्वाचे : India Ports Global Limited (IPGL) भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी आणि या भरतीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : AAI Apprentices Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये १८५ पदांवर भरती; असा करा अर्ज)