Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एनईईपीसीओमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी, १० वी पास उमेदवार अर्ज करू शकणार; परिक्षेशिवाय होणार निवड

12

NEEPCO Apprenticeship 2023: नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice), तंत्रज्ञ शिकाऊ (Technical Apprentice) आणि इतरांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार portal.mhrdnats.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ७५ जागा

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) : २८ जागा
तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) : ८ जागा
ग्रॅज्युएट जनरल (Graduate General Stream) : १४ जागा
ट्रेड अप्रेंटिसच्या (Trend Apprentice) : २५ जागा

(वाचा : Railway Recruitment 2023 : उत्तर-मध्य रेल्वेमध्ये १६९७ जागांवर मेगाभरती; दहावी आणि ITI पास उमेदवारांना करता येणार अर्ज)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

NEEPCO मधील वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असून, पोस्टनुसार, शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहेत…

  • पदवीधर अप्रेंटिसच्या २८ पदांसाठी बीटेक झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या ८ जागांसाठी अभियांत्रिकी डिप्लोमा (Engineering Diploma) आवश्यक आहे.
  • ग्रॅज्युएट जनरल स्ट्रीमच्या १४ पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • ट्रेड अप्रेंटिसच्या २५ पदांसाठी १०वी पास किंवा आयटीआय डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा :

१८ ते २८ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत.
तथापि, एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि माजी सैनिकांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

मिळणार एवढा पगार :

निवडल्यास, उमेदवारांना प्रत्येक महिन्याला १४ हजार ८७७ रुपये ते १८ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड दिले जाईल.

अशी असणार निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड पदवी किंवा डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाईल.
पॉवर स्टेशन्स असलेल्या राज्यांतील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

(वाचा : AIIMS Recruitment 2023 : एम्समध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ३०३६ जागांसाठी भरती, आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.