Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यूजीसी लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असून, नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर त्यापूर्वी उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. UGC ने २०१७ मध्ये UGC-NET च्या अभ्यासक्रमात शेवटची सुधारणा केली होती.
UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. पुढील महिन्यात UGC-NET परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर २०२४ मध्ये UGC NET चे पहिले सत्र १० ते २१ जून जून दरम्यान होणार आहे.
यूजीसीने अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र नवीन अभ्यासक्रमाच्या आधारे पहिली परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर अभ्यासक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाणार असून, त्यासाठी वेळही लागू शकतो. यूजीसी एनईटी (UGC NET) परीक्षा ८३ विषयांमध्ये घेतली जाते, ज्यामध्ये ह्युमॅनिटी, सोशल सायन्स, भारतीय आणि परदेशी भाषांसह विज्ञान विषयांचा समावेश होतो. यूजीसीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, नवीन अभ्यासक्रम तयार झाल्यावर, हा अभ्यासक्रम कधी लागू केला जाईल हे उमेदवारांना आधीच सांगितले जाईल आणि त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) UGC NET परीक्षा आयोजित करते. NTA वैद्यकीय आणि अभियांत्रिकी चाचण्या देखील घेते. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2024 अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी नवीन अभ्यासक्रम देखील लवकरच प्रसिद्ध केला जाईल. त्याच वेळी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई-मेन) २०२४ चा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. UGC NET ही संगणक आधारित चाचणी (CBT) आहे.
(वाचा : UGC चा नवा निर्णय विद्यार्थी हिताचा; आता फक्त १ वर्षात पोस्ट ग्रॅज्युएशन, तर एकाच वेळी २ शैक्षणिक अभ्यासक्रम करता येणार)