Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एसबीआयमध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी भरती; विविध क्षेत्रातील पदवीधर करू शकणार अर्ज

10

SBI CBO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया २२ नोव्हेंबर २०२३ पासून सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी (SBI CBO 2023) ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये अर्ज करणायस ईचूक आणि पात्र उमेदवार SBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२३ असून, त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत विहित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एसबीआयच्या अधिसूचनेनुसार, सदर भरतीच्या माध्यमातून एकूण ५ हजार २८० पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांची निवड ३ टप्प्याच्या परीक्षेनंतर केली जाईल. जर उमेदवार पहिल्या टप्प्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला पुढील टप्प्याच्या परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही.

SBI सर्कलनुसार पदभरतीचा तपशील :

अहमदाबाद : ४३०
अमरावती : ४००
बंगळुर : ३८०
भोपाळ : ४५०
भुवनेश्वर : २५०
चंदिगड : ३००
चेन्नई : १२५
ईशान्य भारत : २५०
हैदराबाद : ४२५
जयपूर : ५००
लखनऊ: ६००
महाराष्ट्र : ३००
मुंबई मेट्रो : ९०
नवी दिल्ली : ३००
तिरुवनंतपुरम : २५०

अधिसूचनेनुसार, निवडीसाठी उमेदवारांची परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये घेतली जाईल. परीक्षेबाबत अधिक माहिती अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल.

आवश्यक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी असलेले उमेदवार आ जागांसाठी अर्ज करू शकतात.
ज्या उमेदवारांकडे वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंटची पदवी आहे असे उमेदवारही या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास पात्रता ठरतील.

वयोमर्यादा :

  • एसबीआयच्या भरतीमध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय ३१ ऑक्टोबर रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त आणि २१ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • उमेदवारांचे वय ३१ ऑक्टोबर २०२२ नंतर आणि १ नोव्हेंबर १९९३ पूर्वी मोजले जाणार नाही.
  • मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

SBI CBO भरतीसाठी असा करा अर्ज :

– सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : SBI PO Prelims Result 2023 : एसबीआय पीओ प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर; मुखी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.