Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
GATE 2024 महत्त्वाच्या तारखा :
गेट २०२४ परीक्षा ३,४, १० आणि ११ फेब्रुवारी रोजी विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
उमेदवार ३ जानेवारी २०२४ पासून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.
संस्था २१ फेब्रुवारी रोजी GATE 2024 च्या Answer Key प्रसिद्ध करेल आणि सदर परीक्षेचा निकाल १६ मार्च २०२४ रोजी घोषित केला जाईल.
GATE 2024 मॉक टेस्ट ‘या’ विद्यार्थ्यांना देता येणार :
GATE 2024 परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठीच मॉक टेस्ट उपलब्ध असेल. नोंदणी दरम्यान उमेदवारांना यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने ही टेस्ट देता येणार आहे. मॉक टेस्टमधील प्रश्न गेट अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीवर आधारित असतात.
IIT मधील M.Tech अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एकूण ३० पेपर्ससाठी ही परीक्षा घेतली जाईल. पेपरमध्ये जनरल अॅप्टिट्यूड विभाग आणि मुख्य विषयाचे प्रश्न असतील.
मॉक टेस्टमध्ये कसे सहभागी व्हावे :
- GATE 2024 मॉक टेस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “GATE 2024 Mock Test” या लिंकवर क्लिक करा.
- तुमची शाखा निवडा.
- “Sign In” बटणावर क्लिक करा.
- एक सूचना विंडो उघडेल, ती काळजीपूर्वक वाचा आणि पुढील बटणावर क्लिक करा.
- तुमची परीक्षा भाषा निवडा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा.
- सूचना वाचल्यानंतर, जेव्हा तुम्हाला चाचणी सुरू करायची असेल तेव्हा “I Agree To Coninue” बटणावर क्लिक करा.
- आता तुमचा सराव सुरू करा आणि उत्तरे सबमिट करा.
- तुमचा GATE 2024 मॉक टेस्ट स्कोअर शेवटी प्रदर्शित केला जाईल.