Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जेईई मेन २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर; अर्जाच्या शेवटच्या तारखेत वाढ होणार…?

12

JEE Main Updates 2024: जेईई मेन २०२४ सत्र १ साठी नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरनंतर वाढवली जाणार नाही.

अभ्यासक्रमातून ही प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत :

रसायनशास्त्र (Chemistry) :
भौतिक प्रमाण (Physical quantities), अचूकता (precision), पदार्थाची अवस्था (states of matter), अणु मॉडेल (atomic models), पृष्ठभाग रसायनशास्त्र (surface chemistry), एस-ब्लॉक घटक (s-block elements), धातूंचे पृथक्करण (dissociation of metals), हायड्रोजन (hydrogen), पर्यावरणीय रसायनशास्त्र (environmental chemistry), पॉलिमर आणि दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र (polymers and everyday life chemistry).

भौतिकशास्त्र (Physics) :
संप्रेषण प्रणाली (communication system)

(वाचा : GATE 2024 मॉक टेस्ट लिंक सक्रिय; परीक्षेच्या सराव आणि MOCK Test गुण तपासणी मोफत)

गणित (Mathematics) :
गणितीय प्रेरण (mathematical induction), गणितीय तर्कशास्त्र आणि त्रिमितीय भूमितीचे काही पैलू (mathematical logic and some aspects of three-dimensional geometry) यांसारखे topics देखील काढून टाकण्यात आले आहेत.

जेईई मेन २०२४ शी संबंधित महत्त्वाच्या तारखा :

नोंदणीची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३
परीक्षेच्या तारखा : २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४
प्रवेशपत्र : परीक्षेच्या तीन दिवस आधी
निकाल जाहीर : १२ फेब्रुवारी २०२४

जेईई मेन २०२४ साठी अशी करा नोंदणी :

पायरी १. अधिकृत JEE Main 2024 वेबसाइट jeemain.nta.ac.in ला भेट द्या.
पायरी २. मुख्यपृष्ठावरील ‘JEE मुख्य नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
पायरी ३. सिस्टम-जनरेट केलेला पासवर्ड किंवा तुमचा DigiLocker किंवा ABC लॉगिन आयडी वापरून लॉगिन करा.
पायरी ४. सुरक्षा प्रश्नाचे उत्तर सबमिट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
पायरी ५. पुन्हा लॉग इन करा आणि तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा, तुम्ही ज्या पेपरसाठी अर्ज करत आहात ते निवडा आणि तुमच्या पसंतीचे परीक्षेचे शहर निवडा.
पायरी ६. तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुढे जा.
पायरी ७. दस्तऐवज अपलोड पूर्ण केल्यानंतर, आवश्यकतेनुसार अर्ज शुल्क सबमिट करा.
पायरी ८. सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी फॉर्मचे पुनरावलोकन करा.
पायरी ९. शेवटी, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : JEE Advanced 2024 परीक्षा २६ मे या दिवशी; परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.