Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण ९७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी, अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एचएसएल कंपनीने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, विविध विभागांमध्ये व्यवस्थापक (Managers),प्रोजेक्ट ऑफिसर (Project Officer) आणि सल्लागार (consultants)या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर, अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. उमेदवारांना पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे.
(वाचा : HVF Apprentice 2023 : अवजड वाहन कारखान्यात ३२० शिकाऊ पदांसाठी भरती; डिप्लोमा-डिग्री धारकांसाठी मोठी संधी)
पदभरतीचा तपशील :
व्यवस्थापक : १५ जागा
उपव्यवस्थापक (वित्त) : ३ जागा
मुख्य प्रकल्प अधीक्षक (तांत्रिक) : २ जागा
उप प्रकल्प अधिकारी : ५८ जागा
वैद्यकीय अधिकारी : ५ जागा
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (डिझाइन) : ६ जागा
वरिष्ठ सल्लागार : १ जागा
वरिष्ठ सल्लागार : ६ जागा
सल्लागार (कायदेशीर) : १ जागा
कुठे आणि कसा कराल अर्ज :
- एचएसएल भरती २०२३ साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट hslvizag.in वरील करिअर विभागात जा.
- संबंधित भरती नोटिफिकेशन डाउनलोड लिंक आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
- या लिंकद्वारे अर्जाच्या पेजवर जा.
- संबंधित पदाच्या अर्ज लिंकवर क्लिक करून आणि मागितलेले तपशील भरा.
- अर्ज सबमिट करा.
- ३०० रुपये अर्ज शुल्क भरा. (SC/ST/PH/महिला उमेदवारांसाठी मोफत)
- पुढील गरजांसाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या
शैक्षणिक पात्रता :
ग्रॅज्युएशन डिग्री, पीजी डिप्लोमा, मास्टर डिग्री.
वयोमर्यादा :
३५ ते ६५ वर्षांच्या दरम्यान.
HSL Recruitment 2023 पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
मुलाखतीच्या आधारावर.
(वाचा : NHAI Recruitment 2023 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज)