Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सलमान खानची क्रेझ कमी झाली? १७ व्या दिवशी टायगर ३ नं केली सगळ्यात कमी कमाई

8

मुंबई: वर्षभरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. हिंदी सिनेसृष्टी आजही चाचपडतेय आणि सावधगिरीनं एकेक पाऊल टाकतेय. शाहरुखच्या पठाण आणि जवाननंतर सलमानच्या टायगर ३ या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. काही आठवड्यांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान खानचा ‘टायगर ३’ हा महत्त्वाकांक्षी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. टायगर येतोय म्हटल्यावर इतर काही हिंदी सिनेमांनी नोव्हेंबरमधून धूम ठोकली. बहुतांश बड्या हिंदी सिनेमांनी ‘टायगर ३’शी संघर्ष नको म्हणून डिसेंबर महिन्यात त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित केल्या होत्या. पण या सगळ्यात टायगरच मागं पडल्याचं चित्र आहेत.
गायक नसतास तर काय झाला असतास? महेश काळेचं दिलखुलास उत्तर, म्हणतो- १९८३ साली…
सलमान खान चा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळं टायगर ३ कडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तसं काही झालं नाही. टायगर ३नं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही.

शूटिंगसाठी मारलेली अवघडलेली मिठी ते खरा साखरपुडा… अशी आहे अमृता बने- शुभंकर एकबोटेची लव्हस्टोरी
यशराज फिल्म्सच्या पाचव्या स्पाय सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच टायगर ३ ची क्रेझ होती. पण सिनेमाच्या रिलीजचा दिवस चुकल्याचं म्हटलं जात आहे. दिवाळीच्या सुट्ट्या तसंच वर्ल्ड कपचा मोठा परिणाम या सिनेमाच्या कमाईवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा चांगलाच फटका सिनेमा बसला आहे.

sacnilk च्या रिपोर्टनुसार सलमान खानच्या या टायगर ३ सिनेमानं १७ व्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली आहे. तर काही दिवसांपूर्वी सिनेमा ५०० कोटींच्या क्लबमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आता या चर्चाही खोट्या ठरत आहेत. कारण सिनेमाची आतापर्यंतची कमाई ही २७६.२५ इतकीच आहे. त्यामुळं सिनेमाला ३०० आकडाही पार करता आली नाहीये. हा आकडा गदर२, जवान आणि पठाण सिनेमांच्या तुलनेत फारच कमी आहे.

बजेट किती?
काही रिपोर्ट्सनुसार सलमानच्या या सिनेमाचं बजेट ३०० कोटींच्या घरात आहे. सिनेमानं बजेट इतकीही कमाईन न केल्यानं सलमानची क्रेझ आता कमी झालीये का? असा प्रश्न विचारला जातोय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.