Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सेटची (SET) ही ३९ वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन होणारी ही शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतर, म्हणजे पुढील वर्षीपासून ४० वी SET (State Eligibility Test) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येईल.
(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर; अर्जाच्या शेवटच्या तारखेत वाढ होणार…?)
पुणे विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते. यंदा १७ शहरांमधील जवळपास २६२ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत घेतली जाणार आहे.
परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ती जाहीर होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. या परीक्षेला जवळपास एक लाख ३ हजार विद्यार्थी बसले होते, अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.
(वाचा : GATE 2024 मॉक टेस्ट लिंक सक्रिय; परीक्षेच्या सराव आणि MOCK Test गुण तपासणी मोफत)