Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि लघुलेखक यांचे प्रवेशपत्र नोव्हेंबरच्या अखेरीस प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. या भरती मोहिमेद्वारे, संस्थेचे सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, आणि अवकाश विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्थांमधील सहाय्यकांसाठी ५२६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
“सहाय्यक/अप्पर डिव्हिजन क्लर्क पदासाठीची लेखी परीक्षा १० डिसेंबर २०२३ रोजी तर, याच दिवसाच्या दुसर्या सत्रात कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / स्टेनोग्राफरसाठी लेखी परीक्षा होणार आहे. नोव्हेंबर २०२३ च्या ४ थ्या / ५ व्या आठवड्यात कॉल लेटर्स जारी केले जातील”,असे वेबसाइटवरील अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट करणाय आले आहे.
ISRO RECRUITMENT 2023 : Indian Space Research Organization (ISRO) सहाय्यक परीक्षेसाठी उपस्थित राहणार्या उमेदवारांना हॉल तिकीट (Admit Card) डाउनलोड करण्यासाठी या Steps Follow करा.
पायरी १ : उमेदवारांनी ISRO च्या www.isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे.
पायरी २ : मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ISRO सहाय्यक परीक्षेसाठी प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
पायरी ३ : तुमचा लॉग इन तपशील जसे की, नोंदणी क्रमांक आणि ईमेल आयडी / जन्मतारीख अशी आवश्यक माहिती भरून सबमिट करा.
पायरी ४ : एकदा पूर्ण झाल्यावर, ISRO सहाय्यक परीक्षा प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
पायरी ५ : सर्व तपशील तपासा आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.
पायरी ६ : भविष्यातील संदर्भासाठी, त्याची प्रिंटआउट घ्या.