Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
भारतीय हवाई दल AFCAT भरती २०२४ मध्ये, फ्लाइंग शाखेसाठी ३८ पदे, ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी १६५ पदे आणि ग्राउंड ड्यूटी नॉन-टेक्निकलसाठी ११४ पदे आहेत.
अर्ज शुल्काविषयी :
भारतीय हवाई दल भरती २०२४ साठी, उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. हे अर्ज शुल्क उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
(वाचा : HSL Recruitment 2023 : हिंदुस्थान शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती, संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची संधी)
वयोमर्यादा :
फ्लाइंग शाखा :
या शाखेतील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांची वयोमर्यादा २० ते २४ वर्षे दरम्यान ठेवण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
तांत्रिक-गैर-तांत्रिक गट :
या शाखेतील जागांसाठी अर्ज करणार्या वयोमर्यादा २० ते २६ वर्षे ठेवली आहे. १ जानेवारी २०२५ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल.
उमेदवारांना नियोजित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विहित तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. याशिवाय, कोणत्याही उमेदवाराचा चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
वेतन :
निवडलेल्या उमेदवारांना ७ व्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.
त्यानुसार, उमेदवारांना ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार दिला जाणार आहे.
AFCAT भरतीसाठी अर्ज करण्यासाठी :
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– आता यूजर आयडी बनवा आणि लॉगिन करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : ICMR NIV Recruitment 2023: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये भरती, १० डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज)