Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२६ मे रोजी होणारी JEE Advanced 2024 परीक्षा आयोजित करण्यासाठी IIT मद्रासकडून सर्व तयारी केली जात आहे. माहितीनुसार, जेईई मेन २०२४ च्या टॉप २.५ लाख उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स २०२४ परीक्षेसाठी बस्ता येईल. या परीक्षेसाठी उमेदवार jeeadv.ac.in वर नोंदणी करू शकतात.
(वाचा : JEE Advanced 2024 परीक्षा २६ मे या दिवशी; परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)
नोंदणी प्रक्रियेनंतर, JEE Advanced 2024 अर्जाची विंडो २१ एप्रिल रोजी उघडेल आणि ३० एप्रिल 2024 पर्यंत खुली राहील. त्यानंतर उमेदवार मर्यादित तपशीलांमध्ये बदल करू शकतील. यावेळी सर्व श्रेणींसाठी JEE Advanced 2024 अर्ज शुल्क वाढवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या २९०० रुपयांच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांकडून अर्जासाठी ३२०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
JEE Advanced 2024 तारखांनुसार, जेईई अॅडव्हान्स २०२४ परीक्षेचे प्रवेशपत्र १७ मे रोजी जारी केले जाईल. IIT मद्रास २ जून रोजी Answer Key जारी करेल तर, JEE Advanced चा निकाल ९ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल डाउनलोड करू शकतील.
जेईई मेन २०२४ ची परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एका सत्राची परीक्षा घेतली जाईल. तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. उमेदवारांना दोन्ही सत्रांमध्ये मिळालेल्या सर्वोत्तम गुणांचा विचार करता येईल. जेईई मेन आणि अॅडव्हान्स परीक्षा या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. दरवर्षी १० लाखांहून अधिक उमेदवार जेईई मुख्य परीक्षेसाठी अर्ज करतात.
(वाचा : Board Exams Updates : दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा)