Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

AIBE 18 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध; १० डिसेंबरला होणार परीक्षा

9

All India Bar Examination : बार कौन्सिल ऑफ इंडियाने AIBE 18 परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाइन नोंदणी केली आहे आणि अठराव्या ऑल इंडिया बार परीक्षेला बसणार आहेत ते आता allindiabarexamination.com या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे हॉल तिकीट (Admit Card) डाउनलोड करू शकतात.

यंदा , AIBE 18 ची परीक्षा १० डिसेंबरला होणार आहे. यापूर्वी, परीक्षा ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार होती, परंतु कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट PG (CLAT PG) आणि State Judicial P.T. (राज्य न्यायिक पी.टी.) ची परीक्षाही याच दिवशी असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

यंदाच्या, AIBE 18 परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटला भेट देऊन त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरणे आवश्यक आहे. परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी हॉल तिकीट अनिवार्य आहे. शिवाय परीक्षा गृहात येताना उमेदवारांनी वैध ओळखपत्र ही सोबत आणणे आवश्यक आहे.

AIBE 18 हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी अर्जदार खाली नमूद केलेल्या पायर्‍यांचा अवलंब करू शकतात. उमेदवारांच्या संदर्भासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देखील खाली सामायिक केली आहे. AIBE 18 प्रवेशपत्र 2023 ची लिंक खाली देण्यात आली आहे.

AIBE 18 प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

पायरी १ : allindiabarexamination.com वर अधिकृत वेबसाइटला भेट द्या
पायरी २ : मुख्यपृष्ठावर, AIBE 18 प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
पायरी ३ : स्क्रीनवर एक नवीन विंडो दिसेल.
पायरी ४ : आता तुमचा अ‍ॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाका आणि सबमिट करा.
पायरी ५ : तुमचे AIBE प्रवेशपत्र 2023 स्क्रीनवर दिसेल.
पायरी ६ : हॉल तिकीट डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.

Direct Link: Download Admit Card Here

तुम्ही डाउनलोड केलेले प्रवेशपत्र परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवाराकडे हा एक अधिकृत पुरावा आहे. त्यात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षेचे ठिकाण, तारीख आणि वेळ यांसारख्या आवश्यक तपशीलांसह सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अ‍ॅडमिट कार्ड बरोबर वैध प्रवेशपत्राशिवाय, उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे, उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी AIBE 18 हॉल तिकिटाची हार्ड कॉपी आणि वैध पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट) सोबत बाळगले पाहिजे.

AIBE प्रवेशपत्र 2023 वर नमूद केलेले तपशील खालील प्रमाणे :

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर/नोंदणी क्रमांक
  • परीक्षेचे नाव
  • उमेदवाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरीची प्रतिमा
  • परीक्षेचे वेळापत्रक
  • परीक्षा केंद्रावर वेळ कळवणे
  • उमेदवारांसाठी सूचना

AIBE 18 परीक्षा २०२३ शी संबंधित अधिक माहिती आणि तपशीलांसाठी अर्जदारांना वेळोवेळी कौन्सिलची अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.