Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
१ ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती; एचडीएफसी बँकेतर्फे परिवर्तन योजना
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता :
- एचडीएफसी बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत.
- तसेच, अर्ज करणार्या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
- शिवाय, या Scholarship साठी अर्ज करणार्या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- तसेच, उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत.
मिळणार एवढी शिष्यवृत्ती रक्कम :
उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे.
इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :
०१. | पदव्युत्तर पदवी ( जनरल ) | ३५ हजार रुपये |
०२. | पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) | ७५ हजार रुपये |
०३. | पदवी ( जनरल) | ३० हजार रुपये |
०४. | पदवी ( प्रोफेशनल) | २५ ते ५० हजार रुपये |
०५. | आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा | १८ आजार रुपये |
०६. | इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत | १८ आजार रुपये |
०७. | इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत | १५ हजार रुपये |
ही कागदपत्र आवश्यक :
सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती, पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :
पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स :
सविस्तर माहितीसाठी आणि शिष्यवृतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.