Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

करिअरमध्ये कामाचा कम्फर्ट झोन शोधताय? मग आजच त्यातून बाहेर पडा; ‘ही’ आहेत त्यामागील पाच कारणे

8

Career Tips : आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार हव्या असतात. जिथे आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला फार त्रास होणार नाही अशा गोष्टी आपण करत असतो. ज्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो. वैयक्तिक आयुष्यात तर आपण कम्फर्ट झोन मध्ये जगतोच. पण बर्‍याचदा आपण आपल्या करिअर मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी देखील कम्फर्ट झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो.

आपण जे क्षेत्र करिअर म्हणून निवडतो किंवा एखाद्या ठिकाणी काम करत असू आणि तिथे मन रमले असेल तर तिथेच बराच काळ नोकरी करतो. अनेकजण अशा कम्फर्ट झोनला प्राधान्य देतात. पूर्वी असे चालायचेही पण आता जर या स्पर्धेच्या युगात तुम्ही कम्फर्ट झोन शोधलात तर त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.

कारण कम्फर्ट झोनची सवय लागली तर आपल्याला सगळ्या गोष्टी सवयीच्या होऊन जातात आणि परिणामी आपला करिअरकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून जातो. त्यामुळे हा कम्फर्ट झोन सोडणे अत्यंत गरजेचे आहे. आता तो का सोडावा, त्याची कारणे काय यावर चर्चा करूया..

तुम्ही अडकून जाता : आपल्याला एखाद्या कंपनीची सवय झाली असेल, तिथल्या कामाची सवय झाली आहे. किंवा बरीच वर्षे तिथे काम करून तुम्ही समाधानी असाल तर हा कम्फर्ट झोन सोडायला हवा. कारण अशावेळी आपण आपल्या क्षेत्रात काय सुरू आहे, नवीन काय प्रयोग घडत आहे, कोणत्या स्वरूपाचे नावीन्य येत आहे, त्यातल्या मार्केट मध्ये काय घडत आहे. याकडे काहीसे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्या प्रगतीच्या संधी कमी होतात. हाच कम्फर्ट झोन सोडला तर आपण अधिक प्रगती करू शकतो.

(वाचा: Mahavitaran Recruitment 2023: ‘महावितरण’ मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या सर्व नोकरीचे तपशील)

शिकण्याची संधी जाते: एकाच ठिकाणी जॉब करून आपल्याला तिथल्या वातावरणाची सवय झालेली असते. त्यामुळे आपले एक विश्व तिथे व्यवस्थित सुरू असते. अशावेळी त्या ठिकाणची नोकरी सोडून वेगळ्या ठिकाणी जाण्याची, नवी वाट निवडण्याची अनेकांना भीती वाटते. परंतु ही भीती मोडून बाहेर पडले तर अनेक संधी उपलब्ध होतात. विशेष म्हणजे नव्या कामात, नव्या क्षेत्रात कामासोबतच शिकण्याची संधी मिळते. ज्याच्या तुमच्या करिअर प्रोफाइलवर सकारात्मक परिणाम होतो.

स्वतःची ओळख निर्माण करण्यात अडथळा : एकाच ठिकाणी, एकाच कंपनीत, त्याच माणसासोबत तुम्ही अनेक वर्षे काम करत असाल तर तुम्ही तिथे अडकून पडता. परिणामी ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथेही तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात असमर्थ राहता. या ऐवजी तुम्ही आव्हाने घेऊन वेगळ्या संधी. वेगळे क्षेत्र निवडत राहिलात तर तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. सोबतच त्या-त्या क्षेत्रात लोक तुम्हाला ओळखू लागतात आणि तुमच्या अनुभवामुळे तुमचे नाव देखील होते.

नव्या गोष्टींपासून दूर राहता : सध्या प्रत्येक क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, तांत्रिक बदल, नवनवीन प्रणाली यामुळे कामाचे तंत्र आणि कार्य पद्धतीही बदलून गेली आहे. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कंपनीत याचा वेगवेगळ्या तर्‍हेने वापर केला जातो. आपण जर कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडलो तरच या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येईल. ज्याचा आपल्याला करिअरमधेही मोठा फायदा होतो.

आर्थिक प्रगती थांबते : प्रत्येक कंपनीमध्ये दरवर्षी किती पगारवाढ होणार हे ठरलेले असते. साधारणपणे ३ टक्के, ५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० टक्के इतकी पगारवाढ केली जाते. काहीवेळा तर काही कंपन्या वर्षाआड पगारवाढ करतात. त्यामुळे एकाच कंपनीत राहून फारशी आर्थिक प्रगती होत नाही. त्याऐवजी जर तुम्ही कम्फर्ट झोन सोडून विविध ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरूपाचे काम केले तर तुमच्या अनुभवानुसार पगारही मोठ्या पटीत वाढत जातो.

(वाचा: CMM Court Recruitment 2023: मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई येथे १०० हून अधिक पदांची भरती; आजच करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.