Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २१ डिसेंबर २०२३ रोजी होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सुपर स्पेशालिस्ट – ०७ जागा
स्पेशालिस्ट – ०७ जागा
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – ११ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २५ जागा
(वाचा: Career Tips: करिअरमध्ये कामाचा कम्फर्ट झोन शोधताय? मग आजच त्यातून बाहेर पडा; ‘ही’ आहेत त्यामागील पाच कारणे)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार डीएनबी, एमडी, एमबीबीएस उत्तीर्ण असावा. पदानुसार विस्तृत शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयोमर्यादा : कमाल वय ६९ वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता : मानव संसाधन विकास केंद्र, (बीएसपी मेन गेट जवळ), भिलाई स्टील प्लांट, भिलाई, छत्तीसगड, ४९०००१.
मुलाखतीची तारीख : २१ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गजरेचे आहे. शिवाय अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखतीसाठी वर नमूद केलेल्या तारखेला सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
(वाचा: Namo Maharojgar Melava 2023: ‘या’ दिवशी होणार शासनाचा ‘नमो महारोजगार मेळावा’; जाणून घ्या सर्व तपशील)