Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित अंतर्गत नाशिक येथे ही पदे भरण्यासाठी उमेदवारांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
नाशिक महानगरपालिका शहर बस सेवा करिता कार्यरत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत ही पदभरती घेतली जाणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादीची माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे ही पदभरती एकवट मानधनावर मुलाखतीद्वारे घेतली जाणारा असून उमेदवाराची निवड कंत्राटी पद्धतीने केले जाणार आहे.
पडभरतीचा तपशील :
महाव्यस्थापक (प्रशासन व तांत्रिक) / General Manager (Admin and Technical) : १ जागा
मुलाखतीचा तपशील :
इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराने मूळ कागदपत्रांसाहित १५ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतीला हजर राहावे या पदभरती मध्ये महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) हे एक पद भरले जाणार असून यासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ७५ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण :
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि (सिटीलिंक), सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलावासमोर, त्रांबक रोड, नाशिक.
शैक्षणिक पात्रता :
- सेवानिवृत्त अधिकारी असणाऱ्या उमेदवारासाठीची भरती असून यासाठी शैक्षणिक पात्रता बी.टेक किंवा बीई (मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी
- मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारास कमीत कमी सात वर्षाचा वाहतूक क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे असेल.
- या अगोदर डेप्युटी जनरल मॅनेजर किंवा सरकारी वाहतूक सेवेमध्ये काम केलेल्या असल्यास अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
– इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचय पत्र (Bio-Data)
– सर्व आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती,
– पासपोर्ट साईज फोटो,
– मूळ कागदपत्रे व त्यांचे छायांकित प्रती साक्षांकित करून वरील तारखेस दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे.