Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
तंत्रज्ञ बी (Technician B) पद
महत्त्वाच्या तारखा :
अर्जाची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरपर्यंत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
शेवटच्या तारखेनंतर येणार्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.
(वाचा : Career In ISRO: ‘चांद्रयान ३’चे यशस्वी उड्डाण केलेल्या इस्रोमध्ये करिअर करणे आहे सोपे, निवडा हे कोर्स)शैक्षणिक पात्रता :
तंत्रज्ञ बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे की त्यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचे दहावी उत्तीर्ण आणि ITI पास प्रमाणपत्र असावे. पात्रता तपशील तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वयोमर्यादा :
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असल्याची खात्री करावी.
तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्काविषयी :
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना अर्जाचे शुल्कही भरावे लागेल.
शुल्काची माहिती अधिसूचनेत दिली आहे.
अशी असणार निवड प्रक्रिया :
तंत्रज्ञ बी पदांसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
मिळणार एवढा पगार :
ISRO च्या या भरतीच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर उमेदवारांना वेतन स्तर 3 (Scale 3) नुसार वेतन मिळेल. म्हणजेच, उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.