Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सीबीएसई २०२४, १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, संपूर्ण वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर

10

CBSE Board Exams Timetable 2024: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, सीबीएसई 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्याअंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर, २ एप्रिल २०२४ ला या परीक्षा संपणार आहेत. CBSE च्या वतीने या परीक्षांच्या अधिकृत तारखांची जाहिरात करण्यात आली नसली तरी, हे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

CBSE १०वी-१२वीच्या महत्त्वाच्या परीक्षेच्या तारखा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. खालील वेळापत्रक हे केवळ सीबीएसईच्या लेखी परीक्षेसाठी असणार आहे, हे पालक आणि विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवणे गरजेचे आहे. CBSE बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेच्या तारखा वैयक्तिक शाळांद्वारे विद्यार्थ्यांना कळवल्या जातील.

तसेच, खाजगी विद्यार्थ्यांसाठी, CBSE 2024 ची परीक्षेच्या तारखा समान राहील. CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या खाजगी उमेदवारांसाठी स्वतंत्र तारखा जाहीर केल्या जाणार नाहीत.

CBSE 2024 चे वेळापत्रक खाली देण्यात आले आहे :

सीबीएसई २०२४ दहावीचे वेळापत्रक :

  • हिंदी : २१ फेबृवारी २०२४
  • इंग्रजी : २६ फेब्रुवारी २०२४
  • विज्ञान : २ मार्च २०२४
  • सामाजिक विज्ञान : ७ मार्च २०२४
  • गणित : ११ मार्च २०२४

सीबीएसई २०२४ बारावीचे वेळापत्रक :

  • इंग्रजी : २२ फेब्रुवारी २०२४
  • गणित : २२ फेब्रुवारी २०२४
  • भौतिकशास्त्र : ९ मार्च २०२४ रसायनशास्त्र 4-मार्च
  • जीवशास्त्र: ९ मार्च २०२४
  • व्यवसाय अभ्यास : २७ मार्च २०२४
  • अकाउंटन्सी : २३ मार्च २०२४
  • अर्थशास्त्र : १८ मार्च २०२४
  • शारीरिक शिक्षण : १२ मार्च २०२४
  • इतिहास : २८ मार्च २०२४
  • राज्यशास्त्र : २२ मार्च २०२४
  • मानसशास्त्र : १५ मार्च २०२४
CBSE Class 12 exam 2024 date sheet.

बोर्ड परीक्षांची तपशीलवार वेळापत्रक तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. विद्यार्थी CBSE दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२४ साठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वरून PDF देखील डाउनलोड करू शकतात. CBSE १० वी आणि १२ वी २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.

महत्त्वाचे : सदरचे वेळापत्रक हे सीबीएसईच्या वतीने शाळांच्या मुख्याध्यापकांना महितीसाठी दिले आहे. बोर्डाच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक लवकरच सीबीएसई च्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे मूळ वेळापत्रकात वरील वेळापत्रकाच्या तुलनेत बादल असण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.