Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सीएसआयआरमध्ये ४४४ जागांसाठी भरती; सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांवर रिक्त जागांवर पदवीधरांना संधी, १ लाखापेक्षा जास्त पगार
पदभरतीचा तपशील :
संस्था : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (Council of Scientific & Industrial Research)
एकूण रिक्त पदे : ४४४ जागा
पदनिहाय जागांचा तपशील :
विभाग अधिकारी (Section Officer) : ७६ जागा
सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) : ३६८ जागा
आवशयक शैक्षणिक पात्रता:
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाच्या विभाग अधिकारी (Section Officer) आणि सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer) या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे.
वयोमर्यादा :
विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारचे कमाल वय ३३ वर्षे असावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांतर्गत सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्काविषयी :
अनारक्षित (UR), OBC आणि EWS : ५०० रुपये
महिला / SC / ST / PWBD / माजी सैनिक / CSIR विभागीय उमेदवार : अर्ज शुल्क नाही
अशी असणार निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा
मुलाखत
संगणक प्रवीणता चाचणी
मिळणार एवढा पगार :
सेक्शन ऑफिसर : ४७ हजार ६०० रुपये ते १ लाख ५१ हजार १०० रुपये प्रति महिना.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर : ४४ हजार ९०० रुपये ते १ लाख ४२ हजार ४०० रुपये प्रति महिना.
महत्त्वाच्या तारखा :
CSIR मधील जागांसाठी ऑनलाइन अर्ज आणि अर्ज शुल्क भरण्याला सुरुवात : शुक्रवार, ८ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजल्यापासून
CSIR मधील जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : शुक्रवार, १२ जानेवारी २०२४ सायंकाळी ५ वाजल्यापासून
CSIR मधील जागांसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस : रविवार, १४ जानेवारी २०२४ सायंकाळी ५ वाजल्यापासून
CSIR स्टेज १ परीक्षा (Stage 1 Examination) : फेब्रुवारी २०२४ (अंदाजे)
CSIR स्टेज २ परीक्षा (Stage 2 Examination) : सीएसआयआरच्या वेबसाइटवर कळवले जाईल.
CSIR Admit Card / Call Letter उपलब्ध होणार : सीएसआयआरच्या वेबसाइटवर कळवले जाईल.
सीएसआयआरमधील पदभरतीसाठी असा करा अर्ज :
- सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइट www.csir.res.in ला भेट द्या.
- होमपेजवरील रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसेल.
- पुढे, “CSIR – एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा – 2023 (CASE – 2023) (अंतिम तारीख : १२/०१२०२४)” या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरा भरा. सर्व कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
- पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंटआउट ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स :
सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
सीएसआयआरच्या पदभरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सीएसआयआरमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.