Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरती; या रुग्णालयातील जागांसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार निवड प्रक्रिया
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : २५ जागा
अधिव्याख्याता पदाच्या एकूण १५ जागा
मेडिसीन : ३ जागा
टीबी चेस्ट : १ जागा
पिडीयाट्रिक : १ जागा
अॅनेस्थेशीय : ४ जागा
फार्मकॉलॉजी : १ जागा
बायोकेमिस्ट्री : १ जागा
ओ.बी.जी.वाय : २ जागा
सर्जरी : १ जागा
ऑथोपेडीक : १ जागा
वैद्यकीय अधिकारी एकूण १० जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
अधिव्याख्याता पदासाठी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील संबंधित विषयातील पदवी (एमडी / एमएस / डीएनबी)
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संध्या / खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्स अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेले नियम व मानांकानुसार
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वैद्यकीय अधिकारी पदासाठी :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एमबीबीएस)
- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणे आवशयक
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
मिळणार एवढा पगार :
वरील पदांकरिता उमेदवाराला दरमहा वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७५,००० रुपये तर अधिव्याख्याता पदासाठी १,५०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
मुलाखतीविषयी :
ठाणे महानगर पालिकेच्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता खलील पत्त्यावर होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता :
कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
- अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- अर्धवट तसेच अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज नाकारण्यात येतील, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या लिंक्स :
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.