Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘परीक्षा पे चर्चा २०२४’ साठी नोंदणी सुरू; पीएम मोदींसोबत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी

12

Pariksha Pe Charcha 2024 Registration : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया Twitter वर २०२४ साठी ‘परीक्षा पे चर्चा’ च्या ६ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी अर्जाची लिंक शेअर केली आहे. ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सामील होण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थी MyGov – Pariksha Pe Charcha innovateindia.mygov.in/ppc-2024/ या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. या नोंदणी प्रक्रियेला ११ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली आहे.

(फोटो सौजन्य : innovateindia.mygov.in)

स्पर्धा जिंकणारे विद्यार्थी प्रत्यक्षात कार्यक्रमाला उपस्थित राहणार :

केंद्र सरकारच्या ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल. यासाठी विद्यार्थी १२ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करू शकता. विद्यार्थी ‘स्वयं-लॉगिन’ किंवा ‘शिक्षकांच्या लॉगिन’द्वारे पोर्टलवर नोंदणी करू शकतात. याशिवाय, या पोर्टलवर शिक्षक आणि पालकांसाठी स्वतंत्र लॉगिनही आहे. पालक आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र स्पर्धाही आखण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होणार्‍या आणि जिंकणार्‍या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांसोबत परीक्षेवरील चर्चेत भाग घेण्याचीही संधी मिळेल.

पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची संधी :

Pariksha Pe Charcha 2024 या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोर्ड परीक्षांबाबत चर्चा करतील. विद्यार्थी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५०० शब्दांत प्रश्न विचारू शकणार आहेत. यासोबतच, पोर्टलवर प्रश्न सबमिट करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी या प्रश्नांची उत्तरे देतील आणि विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यानचा ताण आणि भीती दूर करण्यासाठी प्रवृत्त करतील.

२ हजारहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना Live कार्यक्रम पाहता येणार :

इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सुमारे २ हजार ५० विद्यार्थी, शिक्षक आणि पालक जे या स्पर्धा जिंकतील त्यांना मंत्रालयाकडून विशेष PPC (परीक्षा पे चर्चा) किट दिले जातील. शिवाय, पीपीसीच्या वतीने सहभागाचे प्रमाणपत्र भेट म्हणून दिले जातील. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाविषयी बोलताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले – ‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश तणावाचे यशात रूपांतर करणे हा आहे जेणेकरून आमचे परीक्षा योद्धे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन परीक्षा देऊ शकतील.’

परीक्षा चर्चा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशी करा नोंदणी :

  • उपरोक्त सर्व उपक्रम Mygov इनोव्हेटिव्ह पोर्टलवर होतील.
  • या स्पर्धांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
  • विद्यार्थ्यांना पोर्टलवर त्यांचा प्रतिसाद द्यावा लागेल.
  • विद्यार्थी पंतप्रधान मोदींना ५०० शब्दांत परीक्षेशी संबंधित कोणताही प्रश्न विचारू शकतात.
  • पालक आणि शिक्षक देखील पोर्टलद्वारे त्यांच्या प्रवेशिका सबमिट करू शकतात.

महत्त्वाच्या लिंक्स :

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.