Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काळजी घ्या! मुंबईत करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली; जाणून घ्या ताजी स्थिती

13

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत ३९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात दैनंदिन करोना रुग्णसंख्या अधिकाधिक वाढत असल्याने मुंबईकरांसाठी चिंता वाढली आहे. आजही कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २४३ इतकी होती. तर, दिवसभरात ५०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र आज अधिक आहे. काल ही संख्या २७२ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४ इतकी होती. मात्र, मुंबईतील करोना वाढीचा दर ०.०४ टक्क्यांवरच स्थिर आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत तो तब्बल १,८२५ दिवसांवर पोहोचला आहे. (maharashtra registered 343 new cases in a day with patients recovered 272 and 4 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २१ हजार २५७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्क्यांवरच स्थिर आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ८२५ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून सुरू; राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबईत आज ४१ हजार ६२८ चाचण्या

मुंबईत आज एकूण ४१ हजार ६२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- राज्यपालांनी भेटीची वेळ दिली नाही; भाजपचा दबाव आहे: काँग्रेसचा आरोप

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासात बाधित रुग्ण – ३९७
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५०७
बरे झालेले एकूण रुग्ण – ७२१२५७
बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २७३६
दुप्पटीचा दर- १,८२५ दिवस
कोविड वाढीचा दर (१९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट)-०.०४%

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांना धक्का?; सरकार ‘ती’ माहिती सीबीआयला देण्यास तयार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.