Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीच

9

पुणे,दि.२० : – पुणे शहर पोलिसांच्या वतीने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा,घटक यांची परिपुर्ण माहिती जनमाणसातील सर्व सामान्य नागरीकांना अवगत व्हावी. तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलिसांच्या वतीने तरंग-2023 या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे दिनांक 22/12/2023 ते दिनांक 24/12/2023 रोजी पोलीस मुख्यालय,शिवाजीनगर,पुणे याठिकाणी सकाळी 11/00 ते रात्रौ 10/00 वा.पर्यंत आयोजन केलेले आहे. 2023)
सदर कार्यक्रम सोहळयाचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो / व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वी कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल 112, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो,जलद प्रतिसाद पथक, राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपुर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती प्रदर्शनात असणार आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (ॠद्धद्यत्द्मदृद क्रठ्ठथ्थ्ड्ढद्धन्र्) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन,तसेच फुलेझाडे, रोपवाटीका यांचे पदर्शन असणार आहे.

नविन पिढी,लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन,मुलांसाठी खेळप्रकार,व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच,बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि मराठी सिनसृष्टीतील हास्य कलाकार इतर सेलीबेट्री यांचे विविध कार्यक्रमांचा समाविष्ट करण्यात आला आहे.

सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात असणार आहे. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित राहणार आहेत. तरी नागरीकांनी तरंग मेळावा-2023 या सोहळया मध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, कुशल कारागिर यांनी
बनविलेल्या विविध वस्तु,खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेता येईल.

तरी पुणे शहरातील नागरीकांनी तरंग मेळाव्याचा लाभ घ्यावा असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.