Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वर्ष संपण्यापूर्वी Samsung कडून गुड न्यूज; कमी केली खिशाला परवडणाऱ्या 5G Phone ची किंमत

8

सॅमसंगच्या बेस्ट सेलिंग 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A14 5G ची किंमत कमी झाली आहे. कंपनीनं ह्या फोनवर प्राइस कटसह कॅशबॅक ऑफर देखील सुरु केली आहे. विशेष म्हणजे हा फोन २०२३ च्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. ज्यावर सध्या २,००० रुपयांचा प्राइस कट झाली आहे. चला, जाणून घेऊया तुम्हाला डिवाइसची किंमत, ऑफर्स आणि ह्याचे फुल स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy A14 5G ची नवीन किंमत

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनच्या तीन स्टोरेज ऑप्शनच्या किंमतीत २००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे फोनचा ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट १४,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. जो आधी १६,४९९ रुपयांमध्ये विकला जात होता.

तर ६जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजची किंमत १८,९९९ वरून १६,९९९ रुपये करण्यात आली आहे. तर २२,९९९ रुपयांचा ८जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शन १८,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्राइस कटसह युजर्स अ‍ॅक्सिस बँक कार्डच्या मदतीनं १,००० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळवू शकतात.

Samsung Galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A14 5G मध्ये ६.६ इंचाचा मोठा एफएचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो २४०८ x १०८० पिक्सल रिजॉल्यूशन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. परफॉर्मन्ससाठी Exynos 1330 चिपसेट आहे. सोबत मोबाइलमध्ये ८जीबी पर्यंत रॅम व १२८जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

कॅमेरा फीचर्स पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

डिवाइस ५०००एमएएचच्या बॅटरी आणि १५वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ ५.२, यूएसबी टाइप सी पोर्ट, ३.५मिमी हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Galaxy A14 5G फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट पण मिळतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.